विजाच्या कडकडाटासह पाऊस, आणि बर्फवृष्टीचा हवामान विभागाचा इशारा

Meteorological Department warns of rain with lightning and snowfall

 

 

 

राज्यासह देशात थंडीचा कडाका चांगलाच वाढला होता, मात्र आता पुन्हा एकदा वातावरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

 

देशातील अनेक भागांमध्ये किमान तापमानात वाढ झाली असून, थंडी कमी झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

आयएमडीने दिलेल्या इशाऱ्यानुसार 30 एप्रिल ते 2 फेब्रुवारीदरम्यान काही राज्यांमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो,

 

तर काही राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार पश्चिमी विक्षोभामुळे जम्मू- काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि

 

उत्तराखंडमध्ये जोरदार पावसासह बर्फवृष्टीची देखील शक्यता आहे.दोन फेब्रुवारीपर्यंत ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

यापैकी हिमाचल प्रदेश आणि जम्मू -काश्मीरमध्ये पावसासोबतच बर्फवृष्टी देखील होणार

 

असल्यानं पर्यटकांसाठी हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.

 

हवामान विभागाकडून उत्तर भारतात देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे, पंजाब, हरियाणा, चंडीगढ, दिल्ली एनसीआर आणि

 

उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी 30 जानेवारी ते एक फेब्रुवारीदरम्यान मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

हवामान विभागाकडून देशाच्या अनेक भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असं म्हटलं आहे.

 

सोबतच काही भागांमध्ये बर्फवृष्टीचा देखील इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता विजा, पाऊस, आणि बर्फवृष्टी असं तिहेरी संकट देशावर असणार आहे.

 

महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास महाराष्ट्रात पावसाची शक्यता कमी आहे, हवेत गारठा कायम राहणार आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *