धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ ,अजित पवार उद्या फडणवीसांसोबत चर्चा करणार

Dhananjay Munde's problems increase, Ajit Pawar will discuss with Fadnavis tomorrow

 

 

 

आज ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी अजित पवार यांच्याकडे काही कागदपत्रं सादर केले आहेत,

 

तसेच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे. अजित पवार यांच्या भेटीनंतर अंजली दमानिया यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, यावेळी बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

 

मी आज अजित पवार यांची भेट घेतली, अजित पवार हे धनंजय मुंडे यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यासाठी त्यांच्या कानावर सर्व माहिती टाकली. या भेटीदरम्यान माझ्याकडे जे पुरावे होते,

 

जे व्हिडीओ आणि कागदपत्रं होती ती अजित पवार यांना दाखवली. वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांचे कसे आर्थिक, व्यावहारिक संबंध आहेत? त्याविषयी त्यांना मी माहिती दिली आणि लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली.

 

उद्या मुख्यमंत्र्यांची अजित पवार भेट घेणार आहेत त्यावेळी निर्णय होईल, असं मला वाटतंय धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईल असा मला आता विश्वास वाटत आहे.

 

अजित पवार आणि माझा 36 चा आकडा आहे, हे सर्वांना माहिती आहे. मी माझा इगो सोडून आणि अजित दादांनी देखील स्वतःचा इगो सोडला आमची भेट झाली,

 

त्यामुळे लवकरात लवकर धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई होईल. मी माझी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. राजकीय नेत्यांना भेटून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटून कारवाई संदर्भात मागणी केली आहे.

 

न्यायाधीशांना देखील पत्र लिहिलं आहे, तरी पण न्याय मिळाला नाही तर न्यायालयीन लढाई सुरू राहील, असा इशारा यावेळी दमानिया यांनी दिला आहे.

 

आज दमानिया यांनी अजित पवार यांची भेट घेतली, भेटीनंतर त्यांनी मोठा दावा केला आहे की, मी अजित पवार यांच्याकडे बीडमधील कंपन्यांच्या बॅलेन्स शीट सादर केल्या आहेत.

 

त्या शीटवर मुंडे पती-पत्नीच्या सह्या आहेत. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये असलेल्या आर्थिक संबंधांची माहिती देखील मी अजित पवार यांना दिली असं दमानिया यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

 

अजित पवार यांच्याकडे मी काही कागदपत्रं सादर केली आहेत, बीडमधील सर्व कंपन्यांच्या बॅलेन्स शीट त्यांना दिल्या. या सर्व बॅलन्स शीटवर मुंडे पती-पत्नीच्या सह्या आहेत.

 

असा दावा दमानिया यांनी केला आहे. मुंडे -कराड यांचे आर्थिक संबंध कसे आहेत, याची माहिती दादांना दिली. काही रिल्स देखील दाखवल्या, बीडमध्ये कसं दहशतीचं वातावरण आहे, याची कल्पना अजित पवार यांना दिली असं दमानिया यांनी म्हटलं आहे.

 

त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, अजित पवार यांनी माझं बोलणं अतिशय गांभीर्यानं ऐकून घेतलं. सर्व कागदपत्रं पाहिले. त्यानंतर त्यांनी मला असं अश्वासन दिलं की ते उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत,

 

हे कागदपत्रं ते मुख्यमंत्र्यांना दाखवणार आहेत. त्यानंतर आम्ही योग्य तो निर्णय घेऊ असं अजित पवार यांनी मला सांगितल्याचं दमानिया यांनी म्हटलं आहे. दरम्यान दमानिया यांच्या या भेटीमुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

 

दरम्यान वाल्मिक कराड याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्यावरून देखील अंजली दमानिया यांनी आरोप केले होते. त्याचे रिपोर्ट पाहिले,

 

त्याला काहीही झालं नाही. तो ठणठणीत आहे, मग त्याची बडदास्त ठेवण्यासाठी त्याला रुग्णालयात नेलं होतं का? असा सवाल दमानिया यांनी केला आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *