राज्यात वंचितकडून EVM हटाव मोहिमेला सुरुवात
EVM removal campaign launched by the underprivileged in the state

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. त्यात भाजप महायुतीला बहुमत मिळाले. यानंतर आता राज्यभरातील अनेकांकडून ईव्हीएम मशीनवर विरोधक आक्षेप घेत आहेत.
त्यातच आता वंचित बहुजन आघाडीकडून EVM हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी EVM हटाव या मोहिमेची स्वत: स्वाक्षरी करुन सुरुवात केली. त्यांनतर अकोला येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून स्वाक्षरी करण्यात आली.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात EVM विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्प्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यानुसार येत्या 3 ते 16 डिसेंबरपर्यंत राज्यात EVM विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी व्हिडीओच्या माध्यमातून राज्यातील मतदारांना EVM विरोधात स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
2004 पासून ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात EVM विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. EVM च्या विरोधात न्यायालयीन लढाई सुद्धा ते लढत आहेत.
पत्रकार परिषदेच्या माध्यमातून EVM मधील अनेक घोळ त्यांनी माध्यमासमोर मांडले आहेत. EVM च्या विरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे.
तर दुसरीकडे ‘वंचित’ बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी या मोहिमेवर प्रतिक्रिया दिली. या ईव्हीएम विरोधी जनआंदोलनाला मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत आहेत.
जो पर्यंत निवडणुका बॅलेट पेपरवर घेत नाही, तो पर्यंत वंचित बहुजन आघाडी माघार घेणार नाही. हे आंदोलन असेच सुरू राहणार आहे.
जे पक्ष सत्तेत असताना ईव्हीएमची बाजू घेत होते. आता सत्तेत नसल्यावर ईव्हीएमला विरोध करत आहेत. जर ईव्हीएम विरोधात लढा लढलो तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेता येईल.
बाळासाहेब आंबेडकर म्हणाले आहेत की जोपर्यंत ईव्हीएम रद्द करून निवडणुका बॅलेट पेपर वरती घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. राज्यभर ईव्हीएम विरोधात जनआंदोलन सुरू केले आहे
स्वाक्षरी मोहीम राबवली आहे. टप्याटप्याने आंदोलनाची तीव्रता ही वाढत जाणत आहे. महाराष्ट्रातील मतदारांनी या स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होऊन ईव्हीएम हटवून
या देशाची निवडणूक प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी मदत करावी, असे मत वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी मांडले आहे.