उद्धव ठाकरेंचा अदानीला इशारा म्हणाले एक, दोन महिने थांबा,आमचे सरकार येतंय
Uddhav Thackeray said wait for one or two months, our government is coming

धारावीच्या माध्यमातून मुंबई लुटत आहे. काय नाही दिलं अदानीला. चंद्रपुरची शाळा दिली, कुर्ला मदर डेअरी, मिठागरे सर्व जागा दिल्या. सब भूमी अदानी की झाली. का आम्ही जगायचं. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मुंबई मिळवली.
अदानीने आम्हाला मुंबई दिली नाही. मी माझ्यासाठी लढत नाही. मी मुंबईसाठी लढतोय. तुमच्यासाठी लढतोय. सर्व त्यांना मिळाले तरी लढेल.
तुम्ही आहे म्हणून लढणार आहे. आता आपली सत्ता आली तर धारावी टेंडर रद्द करणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसेना दसऱ्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली.
मोदी तुम्ही फेक नरेटिव्ह केला. यह लोग मंगळसूत्र निकालेंगे. तुम्ही महाराष्ट्राला लुटून महाराष्ट्राचं मंगळसूत्र देणार आहात का. अदानीच्या हातात माता भगिनींचं मंगलसूत्र देणार नाही.
अदानीचं मंगल सूत्र आम्हाला देणार की नाही. आमचं सरकार आल्यावर धारावीचं टेंडर रद्द करणार आहे. धारावीकरांना दूर लोटाचं. मिठागरात टाकायचं,
असा त्यांचा डाव आहे. परंतु मी धारावीत पोलीसांना जागा देईल मुंबईच्या बाहेर टाकणाऱ्या सर्वांना जागा देईन. गिरणी कामगारांना घरे देईल.
एक, दोन महिने थांबा. आमचे सरकार येतंय. ११ दिवसांत १६०० शासन निर्णय जारी झाले आहे. ही तुमची मस्ती आहे. यातील अनेक निर्णय आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही.
जे निर्णय राज्याच्या मुळावर येणार आहे, बिल्डरच्या झोळ्या भरणारे आहेत ते रद्द करूच पण अधिकाऱ्यांना सांगतो या पापात सहभागी होऊ नका. नाही तर तुम्हाला तुरुंगात टाकू.
मुंबई पालिकेची एफडी तोडली. फक्त ४० हजार कोटी राहिले. ते पगारासाठी ठेवावे लागतात, तोडावी लागत नाही म्हणून ठेवली. ९० हजार कोटी उडवून टाकली.
पावणे तीन कोटीची वर्क ऑर्डर यांनी काढली,. कोणती कामे. कुणाला दिली. रस्त्यात कुणी खडी टाकली याचीही चौकशी केली. तीन लाख कोटी कुणाला दिले.
कोणत्या कंत्राटदाराला दिले त्याची यादी हवी. तीन लाख कोटी तुम्ही राज्याचे उधळून टाकली. राज्य सरकारनेही कर्ज घेण्याची मुदत त्यांनी आज वापरली आहे. डिसेंबरची कर्ज घेण्याची मुदत आज वापरली आहे. तुम्ही कर्ज काढून दिवाळी साजरी करत आहात.
शिवतिर्थावर दसरा मेळाव्यात बोलतान उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘दहा बारा दिवसांपूर्वी मी नागपूरला गेलो होतो.
मी शहरीबाबू आहे. मी शेतकऱ्यांचं कर्जमुक्त केलं. माझं कर्तव्य म्हणून केलं. दहा रुपयात पोळी भाजी दिली कर्तव्य म्हणून दिली. मी कोरोनात काम केलं. ते कर्तव्य म्हणून केलं.
मी नागपूरला गेलो. लोकांनी व्यथा सांगितल्या. सोयाबीनला भाव नाही. संत्र्यावर डिंक्या रोग येतो. कापसाच्या बोंडावर गुलाबी अळी येते. ती जॅकेट घालते की नाही माहीत नाही.
अमित शाहजी तुमच्या भाजपच्या खोडाला दाढीवाला खोडकिडा लागलाया आणि तुमच्या बोंडाला गुलाबी अळी लागली ती बघा. आम्हाला वाईट वाटतं एकेकाळचा आमचा मित्र पोखरला जातो. त्यांना सत्ता पाहिजे. कोणी चालेल पण सत्ता पाहिजे. याला म्हणतात सत्ता जिहाद.’
‘एक दोन महिने थांबा. आमचं सरकार येतंय. ही तुमची मस्ती ११ दिवसात १६०० शासन निर्णय जारी. यातील अनेक निर्णय आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही.
जे निर्णय राज्याच्या मुळावर येणार आहे, बिल्डरच्या झोळ्या भरणारे आहेत ते रद्द करूच पण अधिकाऱ्यांना सांगतो या पापात सहभागी होऊ नका. नाही तर तुम्हाला तुरुंगात टाकू.’
‘मुंबई पालिकेची एफडी तोडली. फक्त ४० हजार कोटी राहिले. ते पगारासाठी ठेवावे लागतात, तोडावी लागत नाही म्हणून ठेवली. ९० हजार कोटी उडवून टाकली.
पावणे तीन कोटीची वर्क ऑर्डर यांनी काढली,. कोणती कामे. कुणाला दिली. रस्त्यात कुणी खडी टाकली याचीही चौकशी केली. तीन लाख कोटी कुणाला दिले. कोणत्या कंत्राटदाराला दिले त्याची यादी हवी.’
‘तीन लाख कोटी तुम्ही राज्याचे उधळून टाकली. राज्य सरकारनेही कर्ज घेण्याची मुदत त्यांनी आज वापरली आहे. डिसेंबरची कर्ज घेण्याची मुदत आज वापरली आहे. तुम्ही कर्ज काढून दिवाळी साजरी करत आहात.’ असं ही उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रात भाजप काहीच नव्हती. परंतु भाजपला आम्ही सोबत घेऊन वाढवले. त्यामुळे त्यामुळे भाजपला दिल्लीत सत्ता मिळाली. शिवसेनाप्रमुखांनी दसऱ्या मेळाव्यात सांगितले होते सर्व भेदाभेद घालवून मराठी माणसाची एकजूट बांधा.
जेव्हा मराठी माणसाची ताकद उभी राहिली नसती तर मोदीजी तुम्ही दिल्लीत दिसला नसता. ही मराठी माणसाची ताकद आहे, असे उद्धव ठाकरे यांनी दसऱ्या मेळाव्यात सांगितले.
एका तरुणाला गोरक्षकांनी मारलं. तो गोमांस घेऊन जाणार असल्याचा आरोप होता. पण तो आर्यन मिश्रा निघाला. म्हणून बातमी आली नाही. मग तो आर्यन खान, किंवा आर्यन शेख असता तर त्याचा किती आगडोंब झाला असता.
किरण रिजीजू म्हणतात मी बीफ खातो. त्याचं काय करणार. मला हे थोतांड हिंदुत्व मान्य नाही. त्यामुळे मी त्यांच्याशी लढत आहे.
मराठी लोकात भांडणं लावत आहे. याला आरक्षण देऊ त्याला आरक्षण देऊ म्हणून सांगता. तुमच्यात धमक असेल तर आरक्षण देऊन टाकायला हवं होतं.
मराठा, आदिवासी, धनगरांना का आरक्षण दिलं नाही. वाजपेयींनीही धनगरांना आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं. आजही ते आश्वासन पाळलं नाही. तुम्ही का जातीपातीत भांडणं लावत आहेत.
अमित शाहजी तुमच्या भाजपच्या खोडाला दाढीवाला खोडकिडा लागलाय आणि तुमच्या बोंडाला गुलाबी अळी लाग ली ती बघा”, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली.
तुमचा भाजप सांभाळा. दहा बारा दिवसांपूर्वी मी नागपूरला गेलो होतो. मी शहरीबाबू आहे. मी शेतकऱ्यांचं कर्जमुक्त केलं. माझं कर्तव्य म्हणून केलं. दहा रुपयात पोळी भाजी दिली कर्तव्य म्हणून दिली. मी कोरोनात काम केलं. ते कर्तव्य म्हणून केलं. मी नागपूरला गेलो. लोकांनी व्यथा सांगितल्या.
सोयाबीनला भाव नाही. संत्र्यावर डिंक्या रोग येतो. कापसाच्या बोंडावर गुलाबी अळी येते. ती जॅकेट घालते की नाही माहीत नाही. अमित शाहजी तुमच्या भाजपच्या खोडाला दाढीवाला खोडकिडा लागलाय
आणि तुमच्या बोंडाला गुलाबी अळी लागली ती बघा. आम्हाला वाईट वाटतं एकेकाळचा आमचा मित्र पोखरला जातो. त्यांना सत्ता पाहिजे. कोणी चालेल पण सत्ता पाहिजे. याला म्हणतात सत्ता जिहाद, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
गायीला राज्यमातेचा दर्जा दिला. देशी प्रजाती वाचवलीच पाहिजे. पण मला प्रश्न पडला. तर गाय राज्यमाता झाली आहे. मग राज्यभाषा काय आहे. गाईचा हंबरडा राज्यभाषा आहे.
मग हा हंबरडा राज्यभाषा असेल तर कोवळ्या मुलींवर अत्याचार होत आहे. तर तो हंबरडा तुमच्या कानावर का जात नाही. पहिलं आईला वाचवा, मग गायीला वाचवा. हे आमचं हिंदुत्व आहे. महागाईपासून दूर जाण्यासाठी गायीच्या पाठी लपत आहात, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.
तिसऱ्यांदा सत्ता देऊन तुम्ही म्हणत असाल हिंदू खतरे में है. त्यामुळे मी म्हणेल काँग्रेसची सत्ता बरी आहे. कारण तेव्हा तुम्ही म्हणत होता इस्लाम खतरे में है, हे बांगला देशाला बोलत आहेत.
बांगला देशात काय चाललंय. अहो तुमचे लोक काय करत आहे. मला गद्दारी करून खाली खेचलं हे तुम्हाला दिसलं नाही. शिवसेनाप्रमुखांनी तुम्हाला साथ दिली. आमचं सरकार खेचलं. शकूनी मामा गद्दारांना घेऊन काम करत आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
संघाला सवाल आहे. १०० वर्ष घालवली घ्या चिंतन करा. का १०० वर्ष वाया घालावली. आताची भाजप तुम्हाला मंजूर आहे का. पूर्वीचा भाजप वेगळा होता.
त्यात पावित्र्य होतं. आताचा भाजप हायब्रिड झाला आहे. संकरीत गायी सारखं. परदेशी वळूंची बिजं गर्भाशयात झाला. तसा भाजप झाला. तो भाजप आमच्यावर राज्य करणार.
एवढा वाईट विचार कुणी दिला नव्हता. गद्दार आणि चोरांना नेता मानून राज्य करावं लागतं यातच तुमचा पराभव आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, ‘तिसऱ्यांदा सत्ता देऊन तुम्ही म्हणत असाल हिंदू खतरे में है. त्यामुळे मी म्हणेल काँग्रेसची सत्ता बरी आहे.
कारण तेव्हा तुम्ही म्हणत होता इस्लाम खतरे में है. हे बांगलादेशाला बोलत आहेत. बांगलादेशात काय चाललंय. अहो तुमचे लोक काय करत आहे.
मला गद्दारी करून खाली खेचलं हे तुम्हाला दिसलं नाही. शिवसेनाप्रमुखांनी तुम्हाला साथ दिली. आमचं सरकार खेचलं. शकूनी मामा गद्दारांना घेऊन काम करत आहे.
संघाला सवाल आहे. १०० वर्ष घालवली घ्या चिंतन करा. का १०० वर्ष वाया घालावली. आताची भाजप तुम्हाला मंजूर आहे का. पूर्वीचा भाजप वेगळा होता. त्यात पावित्र्य होतं.
आताचा भाजप हायब्रिड झाला आहे. संकरीत गायी सारखं. परदेशी वळूंची बिजं गर्भाशयात झाला. तसा भाजप झाला. तो भाजप आमच्यावर राज्य करणार. एवढा वाईट विचार कुणी दिला नव्हता. गद्दार आणि चोरांना नेता मानून राज्य करावं लागतं यातच तुमचा पराभव आहे.’
‘गायीला राज्यमातेचा दर्जा दिला. देशी प्रजाती वाचवलीच पाहिजे. पण मला प्रश्न पडला. तर गाय राज्यमाता झाली आहे. मग राज्यभाषा काय आहे. गाईचा हंबरडा राज्यभाषा आहे.
मग हा हंबरडा राज्यभाषा असेल तर कोवळ्या मुलींवर अत्याचार होत आहे. तर तो हंबरडा तुमच्या कानावर का जात नाही. पहिलं आईला वाचवा, मग गायीला वाचवा. हे आमचं हिंदुत्व आहे. महागाईपासून दूर जाण्यासाठी गायीच्या पाठी लपत आहात.’
‘प्रत्येक राज्यात मंदिर उभारले पाहिजे. त्या मंदिरावर शिवाजी महाराजांचे मंत्र कोरले जातील. केवळ शिवजयंतीला पुतळे पुसायचे एवढ्या पुरते आम्ही मर्यादित नाही.
मोदीजी तुम्हाला आणि मिंध्यांना शिवाजी महाराज मतं मिळवणारं यंत्र वाटत असेल. ते काही ईव्हीएम नाही. ईव्हीएम सारखं महाराजांना मानू नका.
मी महाराजांना देव मानतो. जो मंदिराला विरोध करेल त्याला लोक बघून घेतील. शिवाजी महाराजांचं मंदिर नाही बांधायचं तर मोदींचं बांधायचं का.’
‘मला संघाबद्दल, भागवत यांच्याबद्दल आदर आहे. पण ते जे काही करत आहेत. त्याचा आदर नाही. तुम्ही ज्या गोष्टी सांगता त्या कुणाबद्दल सांगत आहात. तुम्ही म्हणता हिंदूंनो स्वसंरक्षणासाठी एकत्र या. मग दहा वर्षापासून विश्वगुरू बसलाय. अजून संरक्षण नाही करू शकला.’
मालवणच्या समुद्र किनाऱ्यावरील शिवरायांच्या पुतळा पडल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. शिवरायांचे स्मारक देखील तुम्हाला करता आले नाही.
आपले सरकार आल्यावर आम्ही प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजाचं मंदिर बांधल्या शिवाय राहणार नाही अशी घोषणा यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की कृष्णाने गीता सांगितली अर्जुनाला. पण अंमलात आणली ती शिवाजी महाराजांनी. त्यांच्यावरही आप्तस्वकीय आले होते. त्यांनी विचार केला नाही.
त्यांनी चालून येणाऱ्यांचा शिरच्छेद केला. आपल्यालाही असाच शिरच्छेद करावा लागेल. आपण जय श्रीराम बोलतो. पण पुराणात राम होऊन गेले. श्रीरामाने रावणाचा वध केला म्हणून पाळतो.
रामाबरोबर वानर सेना होती. आपण त्यांना दे मानतो. आमच्या शिवाजी महाराज कोण होते. फार पूर्वी नाही, तेव्हा जे स्वराज्यावर चालून आले,
त्यांचा वध केला नसता तर आपण आज नसतो. आपलं काय झालं असतं कुणाला माहीत नाही. रामाने जसै दैत्य मारले. तसे शिवाजी महाराजांनी राक्षस आणि दैत्य मारले. अफजल खान हा दैत्यच होता असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
उद्धव ठाकरे यावेळी त्वेषाने म्हणाले की शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. नालायकांनो पुतळा पाडला. आपलं सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही.
आमचं दैवत आहे. जसं आम्ही जय श्रीराम म्हणतो. तसं आम्ही त्याच मोठ्या आवाजात जय शिवराय म्हणणार. जय शिवराय हा महाराष्ट्राचा मंत्र आहे.
दुसरा कोणता राजा पृथ्वीवर असा झाला नाही. आज 400 वर्षांनंतर आज जय भवानी म्हटले तरी मुर्दाही उठून जय शिवाजी म्हणले असेही उद्धव ठाकरे म्हणाले.