ट्रीपल लेअर सिक्योरिटी भेदून EVM ठेवलेल्या गोदामात घुसखोरी;पाहा; VIDEO

Intrusion into warehouse where EVMs are kept by breaching triple layer security; see; VIDEO

 

 

 

 

 

लोकसभेच्या निवडणुकीतील पाचव्या टप्प्यामध्ये ईव्हीएम मशीनमधील गोंधळ आणि संथ गतीने मतदान झाल्याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

 

 

 

असं असतानाच आता महाराष्ट्रामध्ये मतदान केल्यानंतर मतमोजणीसाठी ठेवलेल्या ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाण सीसीटीव्हीच्या कनेक्शनबरोबर छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा शरदचंद्र पवार गटाचे अहमदनगरमधील उमेदवार निलेश लंके यांनी केला आहे.

 

 

 

 

निलेश लंके यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत हा धक्कादायक आरोप केला आहे. सदर व्हिडीओ हा अहमदनगरमध्ये मतदानानंतर ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या गोदामातील असल्याचा दावा लंके यांनी केला आहे.

 

 

 

 

सदर व्हिडीओच्या सीसीटीव्हीमध्ये एक इसम गोदामाच्याबाहेरील बाजूला असलेल्या यंत्रणेमध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे.

 

 

 

 

हा व्हिडीओ अवघ्या 8 सेकंदांचा आहे. व्हिडीओत एक व्यक्ती सीसीटीव्ही यंत्रणा असलेल्या बॉक्सला हात लावून मोबाईलवर काहीतरी पाहत पुढे निघून जाताना दिसतेय.

 

 

 

 

निलेश लंके यांनी, “संरक्षणव्यवस्था थोडे उठा, माणूस गोदामापर्यंत आलाय,” असं म्हणत ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा आरोप केला आहे.

 

 

 

“काल रात्री आमच्या नगर दक्षिण अहिल्यानगर मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा भेदून एका इसमाने प्रवेश करत चक्क शटरपर्यंत जात सीसीटीव्हीमध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न केला.

 

 

 

 

माझ्या सहकार्याने तो लगेच हाणून पाडला,” असं निलेश लंकेंनी म्हटलं आहे. “माझे सहकारी हा इसम पकडू शकतात मग कोणतीही पूर्व सूचना न देताना गेलेल्या त्या व्यक्तीला त्रिस्तरीय सुरक्षा का रोखू शकली नाही?”

 

 

 

 

 

असा सवालही लंके यांनी उपस्थित केला आहे. “कुंपणच आता शेत खातयं. लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जातोय पण प्रशासन मात्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे,” असंही लंकेंनी म्हटलं आहे.

 

 

 

 

 

या पूर्वी बारामतीमध्ये मतदानानंतर ईव्हीएम ठेवलेल्या गोदामामधील सीसीटीव्ही बंद असल्याची तक्रार शरद पवार गटाच्या बारामतीच्या खासदार तसेच यंदा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी केला होता.

 

 

 

 

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही असाच आरोप केला होता. सुप्रिया सुळेंनी 13 मे रोजी व्हिडीओ पोस्ट केला होता.

 

 

 

 

 

“बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडल्यानंतर त्या ईव्हीएम ज्या गोदामामध्ये ठेवल्या आहेत, तेथील सीसीटीव्ही आज सकाळी 45 मिनिटे बंद पडले होते. इव्हीएमसारखी अतिशय महत्वाची गोष्ट जेथे ठेवलेली आहे,

 

 

 

तेथील सीसीटीव्ही बंद पडणे ही बाब संशयास्पद आहे. तसेच हा खूप मोठा हलगर्जीपणा देखील आहे. याबाबत निवडणूक प्रतिनिधींनी संबंधित अधिकारी आणि प्रशासनाला संपर्क साधला असता समाधानकारक उत्तरे आलेली नाहीत.

 

 

 

 

 

याखेरीज सदर ठिकाणी टेक्निशियन देखील उपलब्ध नाही. तसेच आमच्या प्रतिनिधींना ईव्हीएमच्या स्थितीची पाहणी देखील करु दिली जात नाही.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

हे अतिशय गंभीर आहे. निवडणूक आयोगाने तातडीने याची दखल घेऊन सीसीटीव्ही का बंद पडला याची कारणे जाहीर करावी.

 

 

 

याखेरीज संबंधित घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर उचित कारवाई करणे गरजेचे आहे,” असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं होतं.आता निलेश लंकेंनी केलेल्या दाव्यावर प्रशासनाकडून कोणतेही प्रतिसाद आलेला नाही

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *