48 तास महत्त्वाचे, हवामान विभागाचा अलर्ट

48 hours are important, Meteorological Department alerts

 

 

येत्या 2 दिवसांत राज्यातील हवामानात मोठ्या बदलांची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या काही काळात उष्णतेने हैराण नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याचा अंदाज आहे.

 

पुढील 2 दिवसांत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज आहे.

 

पश्चिम महाराष्ट्रात देखील हीच स्थिती राहणार असून पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासांतील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुण्यातील हवामानात आणि तापमानाबाबत जाणून घेऊ.

 

पुण्यामध्ये आज स्वच्छ सूर्यप्रकाश बघायला मिळेल. तेथील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. पुण्यात मुख्यतः निरभ्र आकाश कायम राहणार आहे. आज पावसाची कुठलीही शक्यता नसल्याचं हवामान विभागानं सांगितलंय.

 

साताऱ्यात आज अंशतः ढगाळ आकाश असणार आहे. तेथील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतकं असण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत साताऱ्यात ढगाळ वातावरण कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.

 

सांगलीतील कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. सांगलीमध्ये आज मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे.

 

पुढील 2 दिवसांत सांगलीतील वातावरणात बदल होऊन तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

 

सोलापूरमधील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. गेले काही दिवस सोलापूरमधील तापमान कायम असल्याचं बघायला मिळत आहे.

 

आज सोलापूर मध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश बघायला मिळणार आहे. पुढील 2 दिवसांत सोलापूरमधील हवामानात बदल होऊन हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

 

कोल्हापूरमधील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. कोल्हापूरमध्ये आज मुख्यतः निरभ्र आकाश राहणार आहे. पुढील 2 दिवसांत कोल्हापूरमधील हवामानातही बदल होऊन हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच शहरांतील तापमानात वाढ झाली आहे. आता पुढील 2 दिवसांत वातावरणात मोठा बदल होऊन हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वातावरणात एकाएकी बदल होत असल्याने आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *