आजही मुसळधार पावसाचा इशारा
Warning of heavy rain today
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आजही पावसाचा जोर कायम राहणार आहे. आजराज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कुठं ऑरेंज अलर्ट तर कुठं यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे आणि सातारा जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुंबईसह ठाणे जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
त्याचबरोबर विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट तर काही भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गडचिरोली, चंद्रपूर
आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मागील तीन ते चार दिवसापासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस सुरु आहे. या पावासामुळं नदी नाले दुथढी भरुन वाहत आहेत.
चांगल्या पावसामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने उत्तम साथ दिली आहे. याच कारणामुळे लातूर जिल्ह्यात शंभर टक्के पेरणी झाली आहे.
उत्तम उगवण क्षमता असल्यामुळे पीकही चांगली आली होती. मात्र, मागील सात आठ दिवसापासून सातत्याने होणारा पाऊस आणि सूर्यदर्शनाच्या अभावामुळं खरिपातली सोयाबीन मूग उडीद यासारखी पिके आता पिवळी पडत आहेत.
शेतशिवारामध्ये साचलेलं पाण्याला निचरा मिळत नाही. त्यातच सतत होणारा पाऊस यामुळे पिके पाण्याखाली गेली आहे. अशी स्थिती आणखीन दोन ते तीन दिवस राहिल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आजही राज्यात दमदार पावसाचा सांगावा आला आहे. हवामान विभागाने मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील काही जिल्हा वगळता पावसाने राज्यात जोर बैठका घातल्या. पुणे, मुंबई आणि आसपासचा प्रदेश, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार दिसून आला.
पावसाने नदी-नाले एक झाले आहे. त्यांना पूर आला आहे. त्यामुळे महापूरातून जाण्याचे धाडस अंगलट येऊ शकते. राज्यात या कोसळधारेमुळे सात जणांचा मृत्यू ओढावला आहे.
मुंबई, पुणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे. हवामान विभागानुसार,
राज्यात येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भातील भंडारा, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात कोसळधारेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागानुसार, विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्यानुसार, अमरावती, नागपूर,
गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यात गड गडासह पाऊस पडेल. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, परभणी जिल्ह्यात वरुण राजाची कृपा दिसू शकते.
IMD नुसार कोकणला पावसाचा तडाखा दिसू शकतो. या भागासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी,
सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसेल. मुंबईसहीत उपनगरात पावसाचा जोर दिसेल. ठाणे जिल्ह्याला आज येलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर), पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात गेल्या 24 तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील सहा जणांसह राज्यभरात सात जणांचा मृत्यू झाला आहे.
डेक्कन परिसरातील खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर काम करणाऱ्या तिघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. अभिषेक अजय घाणेकर,
आकाश विनायक माने आणि शिवा परिहार अशी मृतांची नावे आहेत. मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाट विभागात दरड कोसळून एकाचा मृत्यू झाला असून
एक जण जखमी झाला आहे. शिवाजी भैरट असे मृताचे नाव असून तो मुळशी येथील रहिवासी आहे. या घटनेत मुळशी येथील जितेंद्र जांभुर्पाने हे जखमी झाले आहेत.