सावधान !पुढील 24 ते 36 तासात पावसाचा जोर वाढणार

Warning! Rain will increase in next 24 to 36 hours

 

 

 

राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. सध्या कुठं जोरदार पाऊस कोसळतोय, तर कुठं ढगाळ वातावरण असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

 

 

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पावसानं उघडीप दिली आहे. शिअर झोनच्या प्रभावामुळे मुंबईत गेल्या 2 दिवसात पाऊस पडला नसल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.

 

 

दरम्यान, आता तो उत्तरेकडे सरकल्याने आज दुपार आणि संध्याकाळपासून पुढील 24 ते 36 तासात मुंबईत मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

 

तर 18 आणि 19 जुलै हा मुंबईसाठी अधिक पावसाचा असणार आहे. कारण, त्याला पश्चिमेकडील वाऱ्यांचा सर्वाधिक प्रभाव पडणार आहे.

 

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. संपूर्ण कोकणात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

 

 

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

 

 

तसेच मुंबईसह ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये पावासचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरबोर आज संपूर्ण विदर्भात

 

 

पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं आज कोकणसह मध्य महाराष्ट्र मुंबई आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

 

मराठवाडयात दिनांक 17 व 18 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 19 जुलै रोजी जालना, परभणी,‍ हिंगोली, नांदेड जिल्हयात बऱ्याच ठिकाणी

 

 

तर दिनांक 20 जुलै रोजी बीड, धाराशिव, लातूर व छत्रपती संभाजी नगर जिल्हयात बहुतांश ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

 

हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 16 जुलै रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा,

 

 

मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर बीड, धाराशिव, नांदेड, लातूर

 

 

जिल्हयात बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 17 व 18 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

 

दिनांक 19 जुलै रोजी जालना, परभणी,‍ हिंगोली, नांदेड जिल्हयात बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 20 जुलै रोजी बीड, धाराशिव, लातूर

 

व छत्रपती संभाजी नगर जिल्हयात बहुतांश ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

 

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 19 ते 25 जुलै दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

 

 

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 21 ते 27 जूलै 2024 दरम्यान पाऊस, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

 

 

संदेश :

पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी.

 

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

 

 

पीक व्‍यवस्‍थापन

कापूस, तूर, मुग/उडीद, मका व भुईमूग पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची

 

किंवा ॲसिटामॅप्रिड 20 % 2 ग्रॅम प्रति 10 लिटर किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम प्रति एकर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

 

 

कापूस पिकाची लागवड करून एक महिना झाला असल्यास कोरडवाहू कापसास 36 किलो नत्र प्रति हेक्टरी तर बागायती कापूस पिकास 60 किलो नत्र प्रति हेक्टरी वरखताची मात्रा द्यावी.

 

 

 

कापूस, तूर, मुग/उडीद, मका व भुईमूग पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमूळे तूर पिक पिवळे दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ईडीटीए चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-2 50 ग्रॅम किंवा 50 मिली + 19:19:19 खत 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघुन फवारणी करावी.

 

 

मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

 

 

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी, आंबा, द्राक्ष व सिताफळ बागेत पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

 

 

 

काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. भाजीपाला पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

 

 

 

 

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. फुलपिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

 

 

 

पशुधन व्यवस्थापन

पावसाळयात हवेतील वाढलेल्या आर्द्रतेमूळे व कमी तापमानामुळे जनावरांच्या गोठयात ओलसरपणा राहतो. कायम ओलसरपणामूळे जनावरांच्या गोठयात जिवजंतूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी वेगवेगळया आजाराच्या विशेष संसर्गजन्य आजार प्रतिबंधक लसीकरण पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने वेळेवर करून घ्यावे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *