आनंदाची बातमी ; 24 तासांत उकाड्यापासून मिळणार मुक्ती ;हवामान विभागाचा अंदाज
Good news; Relief from heat wave in 24 hours; Forecast of Meteorological Department

मुंबई शहर आणि उपनगरांसाठी पुढील 24 तासांमध्ये हलक्या पावसाची शक्यता असून आकाश अंशत ढगाळ राहण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.
पुढील 24 तासामध्ये कमाल तापमान 34 तर किमान तापमान 29 अंश सेल्सिअस राहील असंही सांगण्यात आलं आहे. आजपासून कोकणातील समुद्री पर्यटन पुढचे तीन महिने बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटकांचाही हिरमोड झाल्याचं दिसतंय.
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळासह सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) वाहण्याची शक्यता आहे. या भागात येत्या 24 तासांमध्ये हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग), हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकणातील समुद्र किनारे नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतात. त्यासाठी देशभरातून आणि राज्यभरातून अनेक पर्यटकांची पसंती कोकण असते.
पण आजपासून 31 ऑगस्टपासून पर्यटन बंद असे तीन महिने कोकणातील पर्यटन बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच मुरूड जंजिरा किल्लाही आजपासून पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोकणात मान्सूनचे आगमन हे 10 जूनपर्यंत होणार असून या ठिकाणी मासेमारीसाठीही बंदी घालण्यात आली आहे. कोकणातील पर्यटन बंद झाल्यामुळे पर्यटकांचा मात्र हिरमोड झाल्याचं दिसतंय.
मान्सून प्रगतिपथावर असून निम्मे बंगालचे उपसागर क्षेत्र तसेच श्रीलंकेचा भूभाग काबीज केले आहे. मान्सूनचे आगमन 31 मे दरम्यान केरळात तर 10 जूनदरम्यान मुंबईसह कोकणात तर
15 जूनदरम्यान कोकणातून सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात तसेच मराठवाडा, विदर्भात होऊ शकते.
मान्सूनची बंगाल शाखा कदाचित लवकर सक्रिय होऊ शकते. तसे झाल्यास सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी व लगतच्या जिल्ह्यांत,
मध्य महाराष्ट्र व खान्देशपेक्षा मान्सूनचे आगमन तेथे अगोदर होऊ शकते. महाराष्ट्रात मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यात दिवसाच्या उष्णतेबरोबर रात्रीचा उकाडाही अधिक जाणवेल, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली