मराठवाडा, विदर्भ गारठणार;हवामान विभागाचा मोठा इशारा

Marathwada, Vidarbha will get cold; Meteorological department has issued a big warning

 

 

 

राज्यात विविध ठिकाणी थंडीचा जोर वाढला आहे. सर्वत्र स्वच्छ सूर्यप्रकाश असून कोरडे हवामान बघायला मिळत आहे. विदर्भात मात्र काहीसे ढगाळ वातावरण असल्याचे दिसून येत आहे.

 

राज्यात कुठेही पावसाची शक्यता नसल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि

 

उत्तर महाराष्ट्रात देखील थंडीचा जोर वाढत असून किमान तापमानात घट झालीये. सोमवारी राज्यातील प्रमुख शहरांत हवामान स्थिती काय राहील? याबाबत जाणून घेऊ.

 

मुंबई शहर आणि उपनगरात मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. 11 नोव्हेंबरला मुंबईतील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस

 

तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. त्याचबरोबर कोकण विभागातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कोरडे हवामान पाहायला मिळेल.

 

पुण्यामध्ये 11 नोव्हेंबरला निरभ्र आकाश राहील. पुण्यातील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतके असणार आहे.

 

पुण्यातील किमान तापमानात दिवसेंदिवस घट होतांना दिसून येत आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना गुलाबी थंडी अनुभवायला मिळणार आहे.

 

छत्रपती संभाजी नगरमध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहणार असून तेथील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतके असणार आहे.

 

मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कोरड हवामान पाहायला मिळेल. त्याचबरोबर आता थंडीचा जोर वाढण्यास सुरवात झाली आहे.

 

विदर्भात पुढील काही दिवस सर्व जिल्ह्यांमध्ये कोरडे हवामान असून ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर थंडीचा जोर वाढण्यास देखील सुरवात झाली आहे. नागपूरमध्ये 11 नोव्हेंबरला कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके असेल.

 

 

नाशिक आणि छत्रपती संभाजी नगर मधील किमान तापमानात सर्वाधिक घट नोंदवल्या गेली आहे. त्यामुळे त्या शहरांत आता थंडीचा जोर वाढणार आहे. मात्र मुंबई मध्ये अजूनही दमट वातावरण असल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *