पाच दिवस राज्यात अवकाळी पावसाचा इशारा, ‘या’ भागात वादळी पाऊस

Warning of unseasonal rain in the state for five days, stormy rain in 'this' area

 

 

 

राज्यातील वातावरणात चांगलाच बदल होत आहे. कुठे थंडीचा कडाका तर कुठं ढगाळ वातावरण दिसत आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवस राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

 

 

रविवारी उत्तर महाराष्ट्रात गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

 

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या विविध भागात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रासह छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसासोबतच वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

 

 

शनिवारी (दि. 25) छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना जिल्हयात काही ठिकाणी, रविवारी (दि.26) बीड, धाराशिव, जालना, परभणी, हिंगोली जिल्हयात बर्‍याच ठिकाणी

 

 

 

तसेच मंगळवारी (दि.27) छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हयात काही ठिकाणी आणि बुधवारी (दि.28) परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात काही ठिकाणी वादळीवार्‍यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

 

 

रविवारी (दि.26) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.

 

 

 

विदर्भात देखील विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात उद्यापासून पावसाचा जोर दिसणार आहे.

 

 

आजपासून पंधरा दिवसानंतर म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात (5 ते 6 डिसेंबर) बंगालच्या उपसागरात पुन्हा एखाद्या चक्रीवादळाची शक्यता आहे. बांगलादेशकडे त्याची वाटचाल राहू शकते.

 

 

 

त्यामुळं महाराष्ट्राला त्याचा धोका नाही. सध्या एल निनो मध्यम तीव्रतेत आहे. मध्यम का असेना पण त्याचे अस्तित्व आहे. शिवाय पावसासाठी पूरक ठरत असतो

 

 

तो धन आयओडी पुढील महिन्यात डिसेंबरअखेर नामशेष होण्याच्या मार्गांवर असल्याचे माणिकराव खुळे म्हणाले. तसेच एमजेओ सध्या फेज 2 मध्ये असून

 

 

 

तो माघारी फिरुन 6 मध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं डिसेंबरमधील चंपाषष्टी दरम्यान पडणाऱ्या पावसाची शक्यताही मावळली असल्याचे माणिकराव खुळे म्हणाले.

 

 

दरवर्षी जशी थंडी असते तशीच थंडी उर्वरित नोव्हेंबर महिन्यात असेल. म्हणजेच थंडी असणार आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत 14 ते 16 डिग्री दरम्यान किमान तापमान असु शकते.

 

 

 

या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात थंडी कमी जाणवण्याची शक्यता आहे. खान्देशात थंडीचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे.

 

 

 

वातावरणीय बदल हा बंगालच्या उपसागरातून 15 डिग्री अक्षवृत्तादरम्यान पूर्वेकडून येणाऱ्या आणि तामिळनाडू केरळ राज्य ओलांडून पश्चिमकडे वाहणाऱ्या मजबूत ‘ पुर्वी वारा झोता ‘ तून वाहणारा हिवाळी मोसमी वाऱ्यामुळं महाराष्ट्रतही जाणवेल.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *