मराठवाड्यात २ जुलै पर्यंत मोठा पाऊस नाही;कृषी विद्यापीठाने दिला शेतकऱ्यांना “हा” सल्ला

There is no heavy rain in Marathwada till July 2; Agricultural University has given this advice to the farmers

 

 

 

 

 

 

 

राज्याच्या विविध भागात पावसाचा चांगलाच जोर पाहायला मिळत आहे. कुठं मुसळधार पाऊस पडत आहे, तर कुठं हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे.आज राज्यातील काही भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 

 

 

आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 

 

 

आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातही

 

 

 

सिंधुदुर्गसह सातारा आणि मुंबईसह ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे

 

 

 

आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे.

 

 

 

ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीची कामे उरकली आहेत.

 

 

 

राज्यात उद्यापर्यंत (30 जूनपर्यंत) मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचे मत ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी व्यक्त केलं आहे.

 

 

 

मुंबईसह ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे.

 

 

 

 

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार

 

 

 

मराठवाडयात दिनांक 28, 29 व 30 जून रोजी काही ठिकाणी तर दिनांक 01 व 02 जूलै रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

 

 

हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 28 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 28, 29 व 30 जून रोजी काही ठिकाणी तर दिनांक 01 व 02 जूलै रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

 

 

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 28 जून 04 जूलै व 05 ते 11 जूलै दरम्यान पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.

 

 

 

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 03 ते 09 जूलै 2024 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

मराठवाडयात ज्या तालूक्यात पेरणी योग्य पाऊस (75-100 मिमी) झाला नसल्यास (परभणी जिल्हा : पूर्णा ; हिंगोली जिल्हा : वसमत, सेनगाव ; लातूर जिल्हा : जळकोट ; नांदेड जिल्हा : नांदेड, बिलोली, हतगाव, देगलूर, उमरी, भोकर, हिमायतनगर, नायगाव) शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. इतर तालूक्यात पेरणी करण्यास हरकत नाही.

 

 

 

संदेश :

मान्सूनचा पेरणीयोग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतरच खरीप पिकांची बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. सर्वसाधारणपणे 15 जूलै पर्यंत सर्व खरीप पिकांची (मूग, उडीद, भुईमूग सोडून) पेरणी करता येते.

 

 

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

 

 

 

 

पीक व्‍यवस्‍थापन

पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच सोयाबीन पिकाची पेरणी करावी. सोयाबीन पिकाची पेरणी 15 जुलैपर्यंत करता येते. सोयाबीन पिकाची पेरणी शक्यतो बी.बी.एफ (रूंद वरंबा सरी) पध्दतीने करावी ज्यामूळे मातीतील ओलावा व जमिनीची सुपिकता टिकून राहण्यास मदत होऊन अधिक उत्पादन मिळते.

 

 

 

वेळेवर पेरणी केलेल्या सोयाबीन पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच खरीप ज्वारी पिकाची पेरणी करावी.

 

 

 

 

खरीप ज्वारी पिकाची पेरणी 07 जुलैपर्यंत करता येते. वेळेवर पेरणी केलेल्या खरीप ज्वारी पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच बाजरी पिकाची पेरणी करावी.

 

 

 

 

 

बाजरी पिकाची पेरणी 30 जुलैपर्यंत करता येते. वेळेवर पेरणी केलेल्या बाजरी पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे. सुरू ऊसाची पक्की बांधणी केली नसल्यास ती करून घ्यावी व नत्र खताचा चौथा हप्ता द्यावा.

 

 

 

 

हळदीमध्ये आंतरपीके घेताना पहिल्या तीन ते साडेतीन महिन्यापर्यंत काढणी होईल अशा प्रकारची आंतरपीके निवडावीत. यामध्ये पालेभाज्या सारख्या आंतरपिकांचा समावेश असावा.

 

 

 

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

पाऊस झालेल्या ठिकाणी नविन संत्रा/मोसंबी बागेची लागवड करावी. नवीन संत्रा/मोसंबी लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. मृग बहार संत्रा/मोसंबी बागेत अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत असल्यास

 

 

 

चिलेटेड झिंक 50 ग्रॅम + 13:00:45 150 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पाऊस झालेल्या ठिकाणी नविन डाळींब बागेची लागवड लागवड करावी.

 

 

नवीन डाळींब लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. पाऊस झालेल्या ठिकाणी नविन चिकू बागेची लागवड करावी. नवीन चिकू लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी.

 

 

 

 

भाजीपाला

पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून बियाद्वारे लागवड केल्या जाणाऱ्या भाज्या उदा. भेंडी, कारले, भोपळा, दोडका ईत्यादी भाजीपाला पिकांची लागवड करावी.

 

 

 

गादीवाफ्यावर तयार केलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांना 45 दिवस झाले असल्यास पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून भाजीपाला पिकांची (वांगी, मिरची, टोमॅटो इ.) पूर्नलागवड करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी.

 

 

 

फुलशेती

पाउस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा असल्याची खात्री करून फुल पिकाची पूर्नलागवड करावी. काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी.

 

 

 

 

चारा पिके

पेरणी न केलेल्या भागात पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतर बिजप्रक्रिया करूनच मका चारा पिकाची पेरणी करावी. मका या चारापिकासाठी 80:40:40 नत्र, स्फुरद, पालाश प्रति हेक्टरी खत मात्रा पेरणीच्यावेळी द्यावी.

 

 

 

 

पशुधन व्यवस्थापन

पावसाळयात ढगाळ व दमट वातावरणामूळे बाह्य परोपजिवी उदा. माशा, पिसवा, डास यांचा प्रादूर्भाव वाढतो. याच्या व्यवस्थापनासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या साहाय्याने उपाययोजना कराव्यात.

 

 

 

तुती रेशीम उद्योग

महाराष्ट्र शासनाने तुती लागवडी करीता तुती बेणे सरळ शेतात लागवड न करता तुती रोपवाटीका तयार करून 3 महिने कालावधी झालेल्या वयाची रोपे आखणी करून 6X3X2 फुट पट्टा पध्दत लागवड करावी. या पध्दतीत 12345 झाडे प्रति हेक्टरी लागतात. रोपाने लागवड केली तर लागवडीत तूट होत नाही.

 

 

 

अन्यथा तुट झाली तर पुन्हा तुती बेणे न लावता तुती रोपेच लावावीत. तुती बेणे पुन्हा येत नाही व तूट कायम राहते. दुसऱ्या वर्षी झाडांची संख्या प्रति हेक्टर शिफारशीप्रमाणे किंवा 90 % च्या वर राहीली तरच मनरेगा योजनेत मंजूरी मिळते.

 

 

 

 

कुक्कुट पालन

पावसामुळे कुक्कुटपालकांना पोल्ट्री बऱ्यापैकी रोगाचा सामना करावा लागत आहे. कमी तापमान आणि उच्च आर्द्रता रोगजनक आणि परजीवींच्या वाढीसाठी परिस्थिती अतिशय अनुकूल बनवते.

 

 

 

पावसाळ्यात तुमच्याय पोल्ट्री शेडचा कंदील (छताच्या बाहेरील भाग) पाऊस झाकण्यासाठी शेड करण्यासाठी 4 ते 5 फूट पुढे असणे आवश्यक आहे. पावसाळ्यात खाद्याचे बुरशीजन्य दूषित होणे ही एक सामान्य समस्या आहे. पावसाळ्यात खाद्य कोरडया जागी साठवा. पाण्याची बॅक्टेरियोलॉजिकल तपासणी करणे आवश्यक आहे.

 

 

 

पावसाळ्याच्या दिवसात हवेत दमटपणा वाढतो तसेच रक्ती हगवणीसारख्या रोगाचा प्रादुर्भाव होतो यासाठी लीटर नेहमी कोरडे राहील याची काळजी घ्यावी. कोलिबॅसिलोसिस, मायको टॉक्सिकोसिस याविरूध्द औषधांचे प्रतिबंधात्मक डोस, विशेषत: neodox-1 ग्रॅम/2 लिटर पाण्यातून देणे.

 

 

 

 

सामुदायिक विज्ञान

पावसाळयात हिरव्या भाजी-पाल्याचा, स्वच्छ धूवून कमी प्रमाणात वापर करावा. याशिवाय फळभाज्या, जसे की कारले, दोडके, दिलपसंद, दुधीभोपळा, बटाटा, शेंगा यांचा जास्त वापर करावा.

 

 

 

कृषि अभियांत्रिकी

शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट कराव्यात.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *