वीज पडून माय लेकीचा मृत्यू

My daughter died due to lightning

 

 

 

आठवडाभराच्या विश्रांतीनंतर शनिवारी व रविवारी जिल्ह्यात विविध भागात पाऊस परतला. रविवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला असून

 

सिल्लोड तालुक्यातील शिसारखेडा येथे वीज पडून माय-लेकीचा मृत्यू झाला. रेणुका हरिदास राऊत व स्वाती हरिदास राऊत, अशी मृत मायलेकींची नावे आहेत.

 

संभाजीनगरमध्ये आठवडाभरापासून पावसाने विश्रांती घेतली होती. वातावरणात उकाडाही उन्हाळ्यासारखाच निर्माण झाला होता. घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले होते.

 

पावसाच्या परतण्याकडे लक्ष लागले होते. अखेर शनिवारी सकाळी अचानकपणे हलका, मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. रविवारी सायंकाळी ४ ते ४.३० असा

 

अर्धा तास शहराच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला. अनेक भागात गडगडाटासह पाऊस पडला. पावसानंतरही वातावरणात उकाडा कायम होता.

 

सिल्लोड तालुक्यातील शिसारखेडा येथे रविवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. या दरम्यान शिवार गट नं. ३० मधील स्वत:च्या शेतात मुगाच्या शेंगा तोडत असताना

 

सायंकाळी ५.३० च्या सुमारास एक जोरदार वीज कडाडली. यामध्ये रेणुका हरिदास राऊत (वय ३८) व स्वाती हरिदास राऊत (१८) या दोघी मायलेकींचा मृत्यू झाला.

 

 

मराठवाड्याच्या अनेक भागातही जोरदार पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात शनिवारी झालेल्या पावसाने मांजरा, साळ नदीला पूर आला.

 

नदी पात्रालगतच्या शेतातील पिके वाहून गेली. अनेक घरांमध्ये पाणी शिरले. पाटोदा महसूल मंडळात ७१.५ मिमी पावसाची नोंद झाली.

 

महासांगवी तलावातून १० हजार ५०० क्युसेस वेगाने मांजरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आष्टी तालुक्यातील

 

कडी नदीला शनिवारी झालेल्या पावसाने पूर आला. पुन्हा एकदा पूल वाहून गेला. यापूर्वी ९ जुलै रोजीही पूल पावसामुळे वाहून गेला होता.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *