अनेक ठिकाणी गारपीट! पुढील काही तासांत ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता

Hail in many places! Chance of rain in this district in next few hours

 

 

 

राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसासह जोरदार गारपीट झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, खेड तर नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचे पावसासह गारपीट झाली. नाशिकच्या ग्रामीण भागात देखील गारपीटीसह पाऊस झाला आहे

 

 

 

पूर्वेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांशी संयोग होऊन कोकण- गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य प्रदेशचा नैऋत्य भाग आणि गुजरातच्या काही जिल्ह्यांमध्ये २४ ते २७ नोव्हेंबर दरम्यान काही ठिकाणी दुपारनंतर हलक्या ते मध्यम

 

 

 

स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. २६ तारखेला उत्तर मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसासह गारपिटीचीही शक्यता आहे.

 

 

 

येत्या तीन तासांत देखील काही ठिकाणी मध्यम पाऊस, तुरळक ठिकाणी गारपिटीसह मुसळधार सरी कोसळण्याची शक्यत वर्तवण्यात आली आहे.

 

 

 

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासोबत उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर. तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे यासह मराठवाड्यातील छ. संभाजीनगर, बीड, जालना तर विदर्भात बुलढाणा, अकोला जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

 

 

 

नाशिक जिल्ह्यातील कसबे, मौजे सुकेने आणि परिसरात बिगर मौसमी पाऊस कोसळत आहे. तर सुकेने परिसरात गारांचा वर्षात झाला. यासह सिन्नर परिसरातदेखील पाऊस कोसळत आहे.

 

 

 

आठवडा बाजार असल्यामुळे नागरिकांची धावपळ झाली. सुकेने, सिन्नरसह चांदोरी परिसरामध्येही गारांचा पाऊस कोसळला आहे. अवकाळी कोसळलेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *