राज्यातील महायुतीतील कोल्डवॉर वादावर अमित शाहांच्या दरबारी होणार समेट ?
Will there be a reconciliation at Amit Shah's court over the cold war dispute within the grand alliance in the state?

सत्ताधारी महायुतीमध्ये सुरू असलेले कोल्ड वॉर सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत. भाजप आणि शिवसेनेमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
तर, दुसरीकडे पालकमंत्री पदांवरूनही शिवसेना नाराज आहे. रायगड आणि नाशिकमधील पालकमंत्री पदाचा वाद सुरू आहे.
दिल्ली सरकारच्या शपथविधीसाठी दिल्लीत दाखल झालेल्या महायुतीच्या नेत्यांची अमित शाह यांच्यासोबत आज बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यात प्रचंड बहुमताने महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे. मात्र, तिन्ही पक्षांमध्ये कुरघोडीचे राजकारण रंगले असल्याचे चित्र आहे. आधी सत्ता वाटप, त्यानंतर पालकमंत्री पदावरून तिढा सुरू झाला आहे.
शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असून समांतर सरकार चालवत असल्याच्या चर्चा मंत्रालय परिसरात सुरू आहेत.
त्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दिल्लीत आहेत. महायुतीतील कोल्डवॉरवर दिल्लीतील बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रायगड, नाशिकच्या पालकमंत्री पदाचाही तिढा सुटण्याची शक्यता आहे.
पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही कायम आहे. दिल्लीतील बैठकीत पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महायुतीतील कोल्डवॉरवर शाहांसोबत चर्चा होण्याची शक्यता आहे. नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदाला स्थगिती मिळाल्यानंतर अद्याप निर्णय झाला नाही.
रायगडसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना आग्रही आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी पालकमंत्री पदाचा निर्णय होण्यासाठी शिवसेना आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपकडून नाशिक तर शिवसेनेचा रायगडवर दावा कायम आहे.
एनडीएच्या बैठकीनंतर केंद्रीय नेतृत्वाच्या नेत्यांशी भेटीगाठी होण्याची शक्यता आहे. अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.