भाजप आमदार सुरेश धस म्हणाले बावनकुळेंनी चुकीची माहिती दिली?

BJP MLA Suresh Dhas said that Bawankule gave wrong information?

 

 

 

भाजप आमदार सुरेश धस यांनी आज महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी सुरेश धस यांना पुन्हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारण्यात आला.

 

त्यावर सुरेश धस यांनी मोठा खुलासा केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी 30 दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्यासोबत भेट झाली होती. ही भेट केवळ 20 मिनिटांची होती.

 

मी लगेच तिथून निघालो होतो. पण बावनकुळे यांनी 4 तास बैठक झाल्याची चुकीची माहिती दिली. ते तसं का बोलले याबाबत तुम्हीच त्यांना विचारा, असं सुरेश धस यांनी स्पष्ट सांगितलं. त्यामुळे बावनकुळे यांनी खोटी माहिती दिली का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

 

“धनंजय मुंडे मंत्रिमंडळ बैठकीत का गैरहजर होते ते मला माहिती नाही. पण मी फक्त त्यांना आजारी असल्याने माणुसकीच्या नात्याने भेटायला गेलो होतो.

 

माझे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला भेटायला बोलावलं होतं. ही 30 दिवसांपूर्वीची घटना आहे. आम्ही 20 ते 30 मिनिटे त्यांच्या निवासस्थानी होतो. रात्री साडेनऊ वाजता गुप्त भेट होऊ शकत नाही.

 

रात्रीच्या दीड वाजेपर्यंत मंत्र्यांच्या चेंबरला गर्दी असते. चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील खुलासा दिला आहे. सुरेश धस बोलले की हे मिटणार नाही. मी मिटणार नाही म्हटलं आणि

 

जागेवरुन चालचा झालो. त्यांच्या तोंडून फक्त बोलता-बोलता साडेचार तास हा शब्द कसा आला हे मी सांगू शकत नाही. याबाबत त्यांना आपण विचारावं”, असं मोठं वक्तव्य सुरेश धस यांनी केलं.

 

“माझ्याकडे संशयाने बघण्यासारखं काही नाही. मला प्रदेशाध्यक्षांनी भेटायला बोलावलं म्हणून मी गेलो. मी भेटून 30 मिनिटांच्या आत बाहेर पडलो. दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्यांदा धनंजय मुंडे यांना रात्री दवाखान्यात नेलं होतं.

 

मला भरणे मामा म्हणाले की, त्यांना दवाखान्यात नेलंय. तर तुम्ही भेटून यायला हवं. राजकारणात तुमची कटुता असली तरी जायला हवं. म्हणून मी गेलो होतो आणि शासकीय निवासस्थानी गेलो होतो.

 

साडेचार तास हा शब्द वापरल्यामुळे मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला. त्यांनी हा शब्द का वापरला? हे तुम्ही बावनकुळे यांनाच विचारा”, असं सुरेश धस म्हणाले.

“बीडच्या एका मोठ्या नेत्याचं आणि कुणाकुणाचं षडयंत्र आहे, याचा टायमिंग जुळवून आणणं, बावनकुळे यांच्या घरी बैठक झाली या गोष्टीला 30 दिवस झाले.

 

तसेच दवाखान्यात दोन दिवसांपूर्वी भेटलो. या दोन्ही घटनांची सांगड घालणं, बरोबर मला आणि तुम्हालाही कळतं. बीड जिल्ह्यातील मोठ्या नेत्याची तक्रार मी शंभर टक्के मुख्यमंत्र्यांकडे करणार.

 

माझी बदनामी करण्याचं चाललं आहे. यामध्ये ठराविक मंडळी आहे. मी त्यांचा लवकरच पर्दाफाश करणार आहे”, असा इशारा सुरेश धस यांनी दिला.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *