मुख्यमंत्री फडणवीस मंत्र्यांवर भडकले ,काय घडले कारण ?
Chief Minister Fadnavis got angry with the ministers, what happened and why?

राज्य मंत्रिमंडळ बैठक मंगळवारी संपन्न झाली. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची माहिती देण्याकरिता मुख्यमंत्री फडणवीस माध्यमांना सामोरे गेले. परंतु यावेळी फडणवीस काही मंत्र्यांवर संतापलेले पाहायला मिळाले.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक होण्याआधीच काही मंत्र्यांच्या कार्यालयाकडून संबंधित निर्णयांसंबंधी आधीच माहिती सांगितली जात असल्याचा मुद्दा प्रकर्षाने समोर येत होता. याच मुद्द्यावरून फडणवीस यांनी मंत्र्यांना झापले.
अलीकडच्या काळात कॅबिनेट व्हायच्या आधी काही लोक अजेंडा छापतात. ही चुकीची पद्धती आहे. मी मंत्र्यांनाही सांगितलं, आपापल्या कार्यालयांना सांगा, कॅबिनेटचा अजेंडा पूर्णपणे गुप्त असतो, अशा शब्दात त्यांनी संबंधित मंत्र्यांना खडसावले.
तसेच यावेळी त्यांनी मंत्र्यांना गोपनीयतेच्या शपथेची आठवणही करून दिली. राज्य मंत्रिमंडळाची बैठक होण्याआधी कोणतीही माहिती उघड करायची नसते, हा नियम आहे.
त्यासाठीच आपण गोपनीयतेची शपथ घेतो. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय सांगणे यात लपवण्यासारखं काही नाही. पण बैठकीआधी ते लीक करू नयेत,
हा नियम आहेत. तो नियम आहे तो पाळलाच पाहिजे. नाहीतर मी संबंधित मंत्र्यांवर कारवाई करेन, असा इशारा त्यांनी मंत्र्यांना दिला.
यावेळी त्यांनी माध्यमांना देखील उपरोक्त नियमांची आठवण करून दिली. प्रसिद्धीसाठी नियम मोडू नका. मंत्रिमंडळ बैठक झाल्यावर आपण त्यासंबंधी बातम्या द्याव्यात, मात्र बैठकीआधी संबंधित बातम्या देऊ नयेत, असेही मुख्यमंत्र्यांनी बजावले.
विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराज यांच्यासंबंधी वादग्रस्त लिखाण होते. ते लिखाण हटविण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. संभाजी महाराज आमचे आदर्श, आम्ही असले लिखाण खपवून घेणार नाही,
असे ते म्हणाले. विकिपीडिया हे भारतातून संचलित होत नाही. इतिहासकालीन गोष्टी संचलित करताना काही मर्यादा गाईडलाईन्स असाव्यात. इतिहासकालीन गोष्टी चुकीच्या लिहिणे हे चांगले नाही, असे फडणवीस म्हणाले.