शपथ घेतांना “या” आमदाराला एकही शब्द नीट वाचता आला नाही;पहा VIDEO

This MLA could not read a single word properly while taking oath; Watch VIDEO

 

 

 

राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि एकनाथ शिंदे व अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर ७ तारखेपासून राज्यात विशेष अधिवेशन बोलावून इतर आमदारांचा शपथविधी कार्यक्रम सुरू आहे.

 

गेल्या दोन दिवसांपासून जवळपास २०० हून अधिक आमदारांनी शपथ घेतली आहे. परंतु, आजचा दिवस आमश्या पाडवी यांनी घेतलेल्या शपथविधीमुळे चर्चेत राहिला.

 

त्यांना शपथविधीतील एकही शब्द नीट वाचता आला नाही. त्यामुळे त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.

 

अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून आमश्या पाडवी यांनी हिना गावित यांना पराभूत केलं. हिना गावित यांच्या उमेदवारीमुळे हा मतदारसंघ निवडणुकीच्या काळात चर्चेत होता.

 

कधी भावनिक भाषणांनी तर कधी जहाल भाषणांनी हा मतदारसंघ निवडणुकीच्या केंद्रस्थानी राहिला. अटीतटीच्या ठरलेल्या या निवडणुकीत आमश्या पाडवी यांचा विजय झाला.

 

आज आमश्या पाडवी यांनी विधानसभेत आमदारकीची शपथ घेतली. परंतु, त्यांची ही शपथही आज चर्चेा विषय ठरली.

 

 

आमश्या पाडवी यांनी दोन ओळींच्या शपथग्रहणाचा मसुदाही नीट वाचला नाही. “मी आमश्या फुलजी पाडवी विधानसभा सदस्या म्हणून निवडून आल्याने शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या भारताची सार्वभौमता

 

आणि एकात्माला उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे, ती निष्ठापूर्वक पार पाडेन”, हे केवळ दोन ओळींची शपथ घेण्यासाठीही त्यांना मदतीची गरज लागली.

 

एवढंच नव्हे तर या दोन ओळींच्या शपथेतही त्यांनी अनेक चुका केल्या. त्यामुळे त्यांचा हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.

 

२०१४ मध्ये शिवसेनेत दाखल झालेल्या पाडवींची शिवसैनिक ते जिल्हाप्रमुख अशी चढती कमान राहिली आहे. काँग्रेस आणि भाजपचे वर्चस्व असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील कट्टर आदिवासी शिवसैनिक म्हणून पाडवींकडे पाहिले जाते.

 

अक्कलकुवा तालुक्यातील अंकुशविहीर गावच्या सरपंचपदापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे पाडवी १९९८ पासून २०१९ पर्यत २१ वर्षे

 

अक्कलकुवा पंचायत समितीचे सदस्य राहिले आहेत. २००१ ते २००८ या कालावधीत अक्कलकुवा पंचायत समितीचे सभापती म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.

 

२०१४ मध्ये पाडवी यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर २०१६ साली त्यांच्यावर शिवसेना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.

 

त्यांच्याकडे शहादा, धडगाव आणि अक्कलकुवा या तीन तालुक्यांमध्ये शिवसेना वाढविण्याचे काम सोपविण्यात आले. जिल्हाप्रमुख असलेल्या पाडवी यांनी २०१४ आणि २०१९ अशा दोन विधानसभा निवडणुका लढविल्या.

 

विधानसभेच्या मागील निवडणुकीत काँग्रेसचे विद्यमान आदिवासी विकास मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांना त्यांनी जोरदार टक्कर दिली.

 

त्यांचा अवघ्या दोन हजार ९६ मतांनी पराभव झाला. भाजप उमेदवाराने केलेल्या बंडखोरीमुळे त्यांचा निसटता पराभव झाला.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *