वाहनातून पाच कोटींची रक्कम जप्त ; ही रक्कम कोणाची? कुठे चालवली होती?

An amount of five crores seized from the vehicle; Whose is this amount? Where did you drive?

 

 

 

पुण्यातील खेड-शिवापूर परिसरात एका गाडीतून जवळपास 5 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. संबंधित गाडी सत्ताधारी आमदाराची असल्याची प्राथमिक माहिती आहे.

 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे-सातारा मार्गावर खेड-शिवापूर येथे पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येत आहे.

 

या नाकाबंदी दरम्यान खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ एका वाहनातून मोठी रक्कम पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे. पोलिसांना संबंधित गाडीतून किती रोख रक्कम मिळाली आहे?

 

याबाबतचा अधिकृत आकडा समजू शकलेला नाही. पण माहितीनुसार, या गाडीत पोलिसांना जवळपास 5 कोटींची रोख रक्कम मिळाली आहे.

 

पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली आहे आणि पुढील तपास सुरु केला आहे. ही गाडी एका बड्या नेत्याची तथा विद्यमान आमदाराची असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर रोख रक्कम घेऊन जाणारे वाहन राजगड पोलिसांनी सोमवारी सायंकाळी ताब्यात घेतले.

 

या वाहनात नक्की किती रक्कम होती हे अजून स्पष्ट झालेले नाही; मात्र या वाहनात मोठी रोख रक्कम असल्याचे बोलले जात आहे. रक्कम कोणाची? कुठे चालवली होती? आदीबाबत राजगड पोलिसांकडून पडताळणी सुरु आहे.

 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे सातारा रस्त्याने एका वाहनातून रोख रक्कम घेऊन जाणार असल्याची माहिती राजगड पोलिसांना मिळाली होती.

 

त्यानुसार राजगड पोलिसांनी सोमवारी दुपारपासून खेड-शिवापूर टोल नाक्यावर सापळा रचला होता. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एक संशयित वाहन टोल नाक्यावर आले.

 

यावेळी या वाहनाची तपासणी केली असता त्यात रोख रक्कम असल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांनी संबंधित वाहन पोलिस चौकीला आणून त्यातील रोख रक्कम ताब्यात घेतली.

 

तसेच या वाहनातील चार जणांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सध्या खेड-शिवापूर पोलीस चौकीत वरिष्ठ पोलीस आणि महसूल अधिकारी दाखल झाले आहेत. या वाहनातील रक्कमेची शहानिशा करण्याचे काम सुरु आहे.

 

 

दरम्यान राज्यात निवडणुकीपूर्वी आचारसंहिता लागली असताना पुणे पोलिसांना एक मोठं घबाड सापडलं आहे. काल पुण्यात खेड-शिवापूर परिसरात एका गाडीतून जवळपास 5 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली.

 

 

ही गाडी सत्ताधारी आमदाराची असल्याचा दावा केला जात आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत ही गाडी शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांची असल्याचा आरोप केला आहे. आता या आरोपावर शहाजीबापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

पुण्यात खेड-शिवापूर परिसरातून जप्त करण्यात ५ कोटींच्या रक्कमेवरुन सध्या राजकारणात खळबळ उडाली आहे. याप्रकरणावरुन शिवसेना खासदार संजय राऊतांनी चांगलाच निशाणा साधला आहे.

 

ज्या गाडीत ही रक्कम सापडली ती गाडी मिंधे टोळीतील एका आमदाराची असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काय बापू.. किती हे खोके?

 

असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. आता यावरुन शहाजीबापू पाटील यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी याप्रकरणी स्पष्टीकरण दिले.

 

“मी रोकड जप्त झाल्याची बातमी टीव्हीला पाहिली. माझं यात कुठेही नाव आलेलं नाही. या गाडीशी माझा कोणताही संबंध नाही. त्या तालुक्यात माझे हजारो कार्यकर्ते आहेत.

 

पण ती गाडी कोणाची याबद्दल मला काहीही कल्पना नाही. मी काल दिवसभर खेड्या-पाड्यात फिरत लोकांशी संपर्क साधत होतो. रात्री १० वाजता मला ही बातमी टीव्हीवर दिसली”, असे शहाजीबापू पाटील म्हणाले.

 

 

“अमोल नलावडे हा शेकापचा कार्यकर्ता आहे. त्याचे वडील शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी होते. गेल्या दोन वर्षांपासून तो माझ्यासोबत शिवसेनेचे काम करत आहे. त्यांचे अनेक व्यवसाय आहेत. त्यात नेमकं काय हे मला माहिती नाही”, असेही शहाजीबापू पाटील यांनी म्हटले.

 

 

“संजय राऊतांची सत्ता गेल्यापासून त्यांना झोपताना झाडं आणि उठताना डोंगर दिसत आहेत. याप्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही.

 

सांगोला म्हटल्यानंतर त्यांचा डोळ्यासमोर फक्त माझा चेहरा दिसतो. मला याबद्दल कोणतीही माहिती नाही. मी थोड्या वेळाने नेमकं प्रकरण काय याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे”, असे त्यांनी म्हटले.

 

या प्रकरणानंतर संजय राऊतांनी ट्वीट करत शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर आरोप केला होता. “मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर १५ कोटी सापडले! हे आमदार कोण?

 

काय झाडी… काय डोंगर…. मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास ७५ कोटी पाठवले. १५ कोटी चा हा पहिला हप्ता! काय बापू.. किती हे खोके?” असे संजय राऊत यांनी म्हटले होते.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *