भुजबळ राहत आहेत राष्ट्रवादीपासून चार हात दुर ,मोदींच्या बैठकीलाही गैरहजर

Bhujbal is staying aloof from NCP, absent from Modi's meeting

 

 

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि पक्षातील दरी वाढत असल्याचे दिसून येत आहे. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी मंगळवारी रात्री बोलावलेल्या बैठकीबरोबरच बुधवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमदारभेटीच्या बैठकीतही भुजबळ सहभागी झाले नाहीत.

 

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भुजबळ यांच्याशी बोलणे झाले असल्याचा दावा मंगळवारी केला होता. मात्र, शनिवार आणि रविवारी होणाऱ्या पक्षाच्या शिबिरातही ते हजर राहणार की नाही, याविषयी अनिश्चितता आहे.

पक्षाचे संस्थापक सदस्य असलेले भुजबळ यांना नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. याविषयीची उघड नाराजी त्यांनी व्यक्त केली होती.

 

मात्र, तरीही पक्षनेतृत्व असो की पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी त्यांची दखल घेतली नाही. यामुळे व्यथित झालेल्या भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

 

फडणवीस यांनीही त्यांना काही काळ थांबण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यानंतरही भुजबळ यांच्याशी पक्षातर्फे संपर्क साधण्यात आलेला नाही.

 

भुजबळ यांनी मुंबई मॅरेथॉनच्या एका कार्यक्रमाला मंगळवारी दुपारी हजेरी लावली. दरम्यान, रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी सर्व आमदार आणि इतर सदस्यांची बैठक घेतली.

 

या बैठकीला भुजबळ उपस्थित नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दुपारी महायुतीच्या आमदारांशी संवाद साधला. याही संवादाला भुजबळ गैरहजेर होते.

 

मंत्री धनंजय मुंडे आणि नरहरी झिरवाळ परवानगी घेऊन या बैठकींना गैरहजर होते. मात्र, भुजबळ यांनी गैरहजेरीबाबत माहिती दिली नसल्याचे कळते.

 

तटकरे यांनी मंगळवारी सायंकाळी भुजबळांशी फोनवरून चर्चा केली, तसेच शिबिरात सहभागी होण्याची विनंती केली. मात्र, त्याला भुजबळांनी प्रतिसाद दिला नसल्याचे कळते.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना विचारले असता, भुजबळ मंगळवारी रात्रीच्या बैठकीला आले नसल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, बुधवारी सकाळी दिल्लीला आल्याने पंतप्रधानांशी झालेल्या संवादात ते हजर होते की नाही

 

याविषयी माहिती नसल्याचे ते म्हणाले. भुजबळ यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *