अभिनेता सैफ अली खान वर हल्ला करणारा आरोपी अटकेत
Accused of attacking actor Saif Ali Khan arrested
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांच्यावर हल्ला झालेल्य़ा प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात यश आलं आहे. कोणत्याही क्षणी पोलीस आरोपीला घेऊन येणार आहेत.
तसेच आरोपीला बांद्रा पोलिस स्टेशनमध्ये हजर केले जाऊ शकते अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणात सैफवर तीन जणांनी हल्ले केले होते.
यातील एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर इतर दोन आरोपी अद्याप फरार आहेत.पोलीस त्यांच्या मागावर आहेत.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी चोरटा हा लोकल ट्रेनने वांद्रयात आल्याची माहिती आहे.त्यानंतर इमारतीच्या नजीक पोहोचल्यानंतर
त्याने दुसऱ्या एका इमारतीत शिरूर सैफच्या इमारतीत शिरकाव केल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय.अशाप्रकारे तो सैफच्या इमारतीत शिरला होता.
इमारतीत जरी चोरटा शिरला असला तरी त्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा आहे. इमारतीच्या लिफ्टमधून प्रवास करायलाही अॅक्सेस कार्डचा वापर करावा लागतो.
त्यात इमारतीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात सीसीटीव्ही आहेत. त्यामुळे सहजासहजी इमारतीच्या आत शिरणे सोप्पे नाही आहे.
मात्र चोरट्याने सैफच्या घरात शिरण्यासाठी इमर्जन्सी पायऱ्यांचा वापर केला होता, अशाप्रकारे हा चोरटा सैफचा घरात शिरला आहे.
दरम्यान आता पायऱ्यांवरून घरात शिरणाऱ्या चोराचं लोकेशन ट्रेस करण्यात पोलिसांना यश आलं आहे. आरोपी प्रभादेवीत असल्याची माहिती होती. त्यानुसार पोलिसांनी चोरट्याला माग काढत त्याला ताब्यात घेण्यात यश आलं आहे.
सैफ अली खानच्या घरात तीन हल्लेखोर शिरले होते. यापैकी एका हल्लेखोराला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर अद्याप दोन आरोपी फरार आहे.पोलीस या दोन आरोपींचा शोघ घेत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सूरू आहे.
या संपूर्ण घटनेत पोलिसांनी इमारतीचे सर्व सीसीटीव्ही तपासले होते. मात्र चोरट्यांची मुव्हमेंट कोणत्याच सीसीटीव्हीत कैद झाली नव्हती . त्यात इमारतीच्या गेटवरही चोख बंदोबस्त होता.
अशा परिस्थितीत सैफच्या 12 मजल्यावरील घरात चोरटे नेमके शिरले कसे? असा प्रश्न पोलिसांना पडला होता.अखेर या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.
डीसीपी दीक्षित गेडाम यांची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली आहे.या पत्रकार परिषदेत पोलिसांनी या घटनेच्या तपासाची माहिती दिली आहे.
विशेष म्हणजे चोर 12 मजल्यावरील सैफच्या घरात कसा शिरला याचे उत्तर पोलिसांनी दिले आहे. डीसीपी गेडाम म्हणाले की,सैफच्या घरात शिरण्यासाठी फायर एक्झिट पायऱ्याचा ( म्हणजेच आग लागल्यावर पळण्यासाठी ज्या पायऱ्यांचा वापर) वापर केला होता, अशी मोठी माहिती पोलिसांनी दिली आहे.
डीसीपी गेडाम पुढे म्हणाले, सैफ हल्ल्याप्रकरणात एका आरोपीची ओळख पटली आहे. त्याने घरात शिरण्यासाठी पायऱ्यांचा वापर केला होता. त्याला अटक करण्यासाठी टीम तपास करत आहे.
तर एका आरोपीची मुव्हमेट या घटने दरम्यान सीसीटीव्ही कैद झाली आहे. त्या दिशेने त्याचा तपास सूरू आहे. तसेच 10 वेगवेगळ्या टीम वेगवेगळ्या दिशेने तपास करत आहेत,अशी माहिती गेडाम यांनी दिली.
विशेष म्हणजे आरोपी चोरीच्या उद्देशानेच घरात शिरला होता, असे माहिती प्राथमिक तपासात समोर आलं आहे. आरोपीला सध्या अटक करण्याकडे आमचे लक्ष आहे.
अटक केल्यानंतर आम्ही पुढच्या गोष्टी तुम्हाला सांगू असे गेडाम यांनी सांगितले आहे. त्याचसोबत घटनास्थळी कोणते हत्यार सापडले आहे का? याबाबत माहिती देणे गेडाम यांनी टाळले आहे. याउलट आरोपींच्या अटकेनंतर संपूर्ण माहिती देणार असल्याचे गेडाम यांनी सांगितले आहे.