ऐश्वर्या राय सोबतच्या ब्रेकअपबाबत विवेक ऑबेरॉयचा मोठा गौप्यस्फोट

Vivek Oberoi's big secret about his breakup with Aishwarya Rai

 

 

 

 

 

विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय हे दोघेही बॉलिवूडचे लोकप्रिय सेलिब्रिटी आहेत. विवेक हा बॉलिवूडचा चार्मिंग बॉय आहे. त्याच्या लूक्सचं नेहमीच कौतुक होत असतं.

 

 

सिनेमांमुळे तो चर्चेत असतो. पण सिनेमांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे तो जास्त चर्चेत असतो. आता नुकत्याच एका मुलाखतीत त्याने ऐश्वर्या रायबद्दल भाष्य करत त्यांच्या ब्रेकअपचाही खुलासा केला आहे.

 

 

विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय यांच्या अफेअरची चांगलीच चर्चा रंगली होती. सध्या दोघेही आपापल्या आयुष्यात आनंदी आहेत. काही दिवसांपूर्वी विवेकने ऐश्वर्या आणि त्याच्या रिलेशनबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं.

 

 

 

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्याच्या आयुष्यात विवेक आला होता. इंडस्ट्रीतील सुखी जोडपं म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. पण त्यांचं नातं वादाच्या भोवऱ्यातही अडकलं होतं.

 

 

 

विवेक ओबेरॉयने आरोप लावला होता की, ऐश्वर्यासोबत नातं तोडण्यासाठी त्याला धमक्या मिळत होत्या. नुकत्याच एका मुलाखतीत याबद्दल भाष्य करत अभिनेता म्हणाला,”कमिटमेंट आणि जबाबदारी झटकण्याची सवय मला नाही

 

 

पण मला सर्वांनीच धोका दिला आहे. लोकांनी वचन दिलं. पण ते पूर्ण करण्याचा त्यांनी कधी प्रयत्नच केला नाही”.
विवेक ओबेरॉय पुढे म्हणाला,”माझ्या अनेक गर्लफ्रेंड माझ्या लग्नातही उपस्थित होत्या.

 

 

 

ऐश्वर्यासोबतचं नातं तुटल्यानंतर विवेकची जखम भरलेली नाही, अशी शक्यता चाहत्यांकडून वर्तवली जात आहे.

 

सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या राय विवेक ओबेरॉयला डेट करू लागली. ‘क्यों हो गया ना’ या सिनेमाच्या सेटवर ऐश्वर्या आणि विवेक यांची पहिली भेट झाली होती.

 

 

 

या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान ऐश्वर्या आणि विवेकमध्ये चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आणि त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली.

 

 

 

सलमानला नंतर ही गोष्ट कळली. पुढे विवेक ओबेरॉयने पत्रकार परिषद घेत सलमानवर गंभीर आरोप लावले. विवेकने वैयक्तिक गोष्टी जगजाहीर केल्याचं ऐश्वर्याला पटलं नाही.

 

 

 

 

त्यानंतर तिने विवेकसोबतचं नातं तोडलं. त्यानंतर विवेकलाही सिनेमांच्या खूप कमी ऑफर येऊ लागल्या. विवेक पुढे 2010 मध्ये प्रियंका अल्वासोबत लग्नबंधनात अडकला.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *