अभिनेता अमीर खान करणार तिसरे लग्न ;पाहा कोण आहे त्याची गर्लफ्रेंड ?

Actor Aamir Khan to get married for the third time; see who is his girlfriend

 

 

 

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान १४ मार्च २०२५ रोजी त्याच्या साठावा वाढदिवस साजरा करणार असून, त्याआधी म्हणजे गुरुवारी संध्याकाळी त्याने त्याच्या प्रेमाची कबुली दिली.

 

आमिर पुन्हा प्रेमात पडला आहे. आमिर खानच्या या गर्लफ्रेंडचे नाव गौरी स्प्रॅट असे असून, तो तिला सुमारे २५ वर्षांपासून

दीर्घकाळापासून आमिरच्या अफेअरची चर्ता होती, अखेर त्याने जगासमोर कबूल केले की तो गौरीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

 

आमिर त्याच्या ६० व्या वाढदिवशी असे सरप्राइज देऊ शकतो अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. मुंबईत आमिरने पापाराझींसोबत संवाद साधला, वाढदिवसाचा केकही कापला.

 

यावेळी त्याने त्याची प्रेयसी गौरीची ओळख करून देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. आमिर आणि गौरी यांनी एकत्र बसून माध्यमांशी संवादही साधला.

 

आमिरने अशी माहिती दिली की, ते दोघेही २५ वर्षांपूर्वी भेटले होते आणि त्यानंतर त्यांच्यातील संपर्क तुटला.

पण काही काळापूर्वी ते पुन्हा जोडले गेले. आमिर म्हणाला की ते गेल्या १८ महिन्यांपासून एकत्र आहेत आणि तो गंमतीने असेही म्हणाला की, ‘बघा, मी तुम्हाला कळूही दिले नाही.’

 

आमिरने असेही म्हटले की, ‘गौरी आणि मी २५ वर्षांपूर्वी भेटलो होतो आणि आता आम्ही एकत्र आहोत. आम्ही एकमेकांबद्दल गांभीर्याने विचार करत आहोत आणि वचनबद्धही आहोत, आम्ही दीड वर्षांपासून एकत्र आहोत.’

 

मीडिया रिपोर्टनुसार, गौरी ही बंगळुरूची आहे. आमिरने म्हटले की, त्याने गौरीला शोबिझच्या ‘वेड्या जगासाठी’ तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने सांगितले की तो गौरीसोबत राहतो आहे,

 

जी सहा वर्षांच्या मुलाची आई आहे. त्याने सांगितले की तो तिच्या कुटुंबातील सदस्यांनाही भेटला आहे आणि ते त्यांच्या नात्याबद्दल आनंदी आहेत. २००१ मधील त्याच्या हिट ‘लगान’चा संदर्भ देत त्याने म्हटले की, ‘भुवनला अखेर त्याची गौरी सापडली आहे.’

 

आमिरने असेही सांगितले की त्याने गौरीची ओळख त्याचे जुने मित्र शाहरुख खान आणि सलमान खान यांच्याशी करुन दिली. आमिरच्या मुंबईतील घरात त्यांची भेट झाली होती.

 

 

मीडिया रिपोर्टनुसार, गौरी प्रोडक्शन क्षेत्रात काम करते. ती आता अभिनेत्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग झाली असून, अभिनेत्याने असेही म्हटले की, तो दररोद गौरीसाठी गाणेही गातो.

 

दरम्यान आमिरच्या याआधीच्या नात्याबद्दल सांगायचे झाल्यास, त्याचे पहिले लग्न रीना दत्तासोबत झाले होते, त्यांना जुनैद आणि आयरा अशी दोन मुले आहेत. तर त्याने किरण रावशी दुसरे लग्न केले आणि त्यांना आझाद नावाचा मुलगा आहे. आमिर या

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *