अखेर कंगना रनौत भाजपकडून निवडणूक लढवणार
Finally, Kangana Ranaut will contest elections from BJP
बॉलिवूडमधील उत्तम अभिनेत्रींमध्ये कंगना रनौतचे नाव घेतले जाते. कंगनाने आजवर आपल्या अनेक सिनेमांमधून दमदार भूमिका केल्या आहेत. मागील काही महिन्यांपासून आपल्या वक्तव्यांमुळे ती नेहमीच चर्चेत राहिली आहे.
तिची बरीचशी वक्तव्ये राजकीय असल्याने कंगना राजकारणात उतरणार की काय अशा शक्यता वर्तवल्या जात होत्या. आता
या शंकेला कंगनाच्या वडिलांनीच पुष्टी दिली आहे. त्यामुळे कंगना २०२४ मध्ये भाजपकडून लोकसभेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत.
कंगनाचे वडील अमरदीप रनौत यांनी कंगनाच्या राजकीय प्रवेशाविषयी विधान केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार भाजपने कंगनाला निवडणुकीचं तिकीट दिल्यास ती निवडणूक लढवण्यास तयार आहे.
भाजप कंगनाला हिमाचल, महाराष्ट्र किंवा उत्तर प्रदेशमधून उमेदवारी देण्याची शक्यता तिच्या वडिलांनी वर्तवली आहे. याशिवाय भाजपने कंगनाला हिमाचलमधून उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्यास मंडी लोकसभा मतदारसंघ हे तिचे कार्यक्षेत्र असेल.
कंगनाने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची काही महिन्यांतच तिसर्यांदा भेट घेतली. रविवारी झालेल्या या भेटीत कंगनाच्या मनाली येथील निवासस्थानी नड्डा यांनी भाजपच्या इतर नेत्यांसोबत नाश्ताही केला होता.
त्यामुळे कंगनाच्या भाजपमधील प्रवेशावर चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. त्यातच आता वडिलांनीही पुष्टी दिल्याने कंगना लोकसभा निवडणूक लढवताना दिसण्याची शक्यता आहे.