ए आर रेहमान-सायरा बानू यांचा घटस्फोट;दुःखद मनाने लिहली पहिली पोस्ट;,…..

AR Rehman-Saira Banu Divorce; First post written with a sad heart; Said,.....

 

 

 

लोकप्रिय संगीतकार ए आर रेहमान आणि त्यांच्या पत्नी सायरा यांनी लग्नाच्या २९ वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांच्या वकिलांनी निवेदन जारी करत ए आर रेहमान आणि सायरा घटस्फोट घेणार असल्याची घोषणा केली आहे.

 

या जोडप्याला खतिजा, रहीमा आणि आमीन अशी तीन मुलं आहेत. घटस्फोटाच्या घोषणेनंतर ए आर रेहमान यांनी एक्स पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मंगळवारी रात्री एक्स पोस्ट शेअर करत ए आर रेहमान यांनी घटस्फोटाच्या घोषणेनंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते लिहितात, “आम्ही सहजीवनाची ३० वर्षे पूर्ण करू अशी आशा आम्हाला होती पण,

 

प्रत्येक गोष्टीचा एक अप्रत्यक्ष अंत असतो. एखादी गोष्ट विखुरली तर ती पुन्हा जोडली जाऊ शकत नाही, एकदा विखुरलेले तुकडे पुन्हा जोडले तरीही

 

त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. या कठीण काळात आमच्या प्रायव्हसीचा आदर करा… आयुष्याच्या या नाजूक टप्प्यावर आम्हाला साथ दिल्याबद्दल सर्वांचे आभार”

घटस्फोटाच्या घोषणेनंतर, ए आर रहेमान यांचा मुलगा आमीनने देखील आमच्या प्रायव्हसीचा आदर करा असं आवाहन करणारी एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

 

“या काळात प्रत्येकाने आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा अशी आम्ही विनंती करतो. तुम्ही आम्हाला समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.”

 

असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. याशिवाय ए आर रहेमान यांची मुलगी रहीमा हिने वडिलांची पोस्ट रिशेअर करत दु:ख व्यक्त केलं आहे.

 

दरम्यान, सायरा बानू व ए आर रेहमान यांच्या वकील वंदना शाह यांनी मंगळवारी या जोडप्याच्या विभक्त होण्याच्या निर्णयाबाबत एक निवेदन जारी केलं होतं.

 

“लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर श्रीमती सायरा यांनी पती ए आर रेहमानपासून वेगळं होण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांच्या नात्यातील भावनिक तणावानंतर घेण्यात आला आहे.

 

या जोडप्याचं एकमेकांवर प्रेम असूनही त्यांच्या नात्यात तणाव व अडचणी निर्माण झाल्या होत्या. या अडचणी कोणालाही दूर करता येणार नाहीत असं सायरा यांनी सांगितलं आहे.

 

या आव्हानात्मक व कठीण काळात समजूदारपणा दाखवून सर्वांनी त्यांच्या प्रायव्हसीचा आदर करावा अशी विनंती सायरा यांनी सर्वांना केली आहे. कारण, आयुष्यातील सर्वात कठीण काळातून त्या सध्या जात आहेत” असं या निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *