व्हॉट्सअ‍ॅपने ७५ लाख अकाउंट्स केले बंद;काय आहे कारण?

WhatsApp closed 75 lakh accounts; what is the reason?

 

 

 

 

WhatsApp आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत नवीन अपडेट आणत असते. या WhatsApp चे जाळे जगभरात असंख्य ठिकाणी पसरले आहे. यावरुन आपल्या एकमेकांशी सहज संवाद साधता येतो.

 

 

 

 

2023 च्या वर्षात WhatsApp अनेक बदल केले तसेच युजर्ससाठी नवीन अपडेटही आणले. परंतु, ऑक्टोबर महिन्यात अनेक अकाउंट मोठी कारवाई करण्यात आली.

 

 

गेल्या काही वर्षात व्हॉट्सअॅपने प्रायव्हसी आणि स्पॅम मेसेज पाठवणाऱ्यांवर कडक कारवाई केले आहे. व्हॉट्सअॅपच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मोठ्या प्रमाणात अकाउंटवर बंदी घातली आहे. यामुळे ऑक्टोबर महिन्यात व्हॉट्सअॅपने जवळपास ७५ लाख खाती बॅन केली आहेत.

 

 

 

नवीन आयटी कायद्यानुसार व्हॉट्सअॅप अकाउंटवर बंदी घालण्यात आली आहे. मेटाने तयार केलेल्या ऑक्टोबरच्या अहवालानुसार १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२३ दरम्यान भारतात एकूण ७५ लाख व्हॉट्सअॅप खाती बॅन  करण्यात आली आहेत. या काळात व्हॉट्सअॅपवर सुमारे ९,०६३ खात्यांबाबत तक्रारी करण्यात आल्या.

 

 

 

1. कोणत्या खात्यावर बंदी?

जे अकाउंट खाते स्पॅम होते त्या व्हॉट्सअॅप अकाउंटविरुद्ध तक्रार करण्यात आली होती. याचे कारण असे की, इतर युजर्सची गोपीनियता यामुळे राखण्यात येईल. तसेच या नंबरवरुन कायद्याचे उल्लंघन झाले आहे.

 

 

फोटोचा किंवा व्हिडिओचा गैरवापर केला गेला आहे. किंवा अश्लील मजकुराचा पसरवण्यात आला आहे. अशा खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच ज्या नंबरवरुन खोटे किंवा फसवणारे मॅसेज येत आहेत. अशा खात्यांवरही बंदी घातली आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *