ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन झाले वेगळे ?, सोडले अभिषेकचे घर
Aishwarya Rai and Abhishek Bachchan broke up?, left Abhishek's house
ऐश्वर्या राय ही कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. ऐश्वर्या राय हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. ऐश्वर्या राय हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय ही तिच्या पर्सनल लाईफमुळे चांगलीच चर्चेत आहे.
काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या राय हिने अमिताभ बच्चन यांना सोशल मीडियावर अनफाॅलो केले इतकेच नाही तर अमिताभ बच्चन यांनी देखील ऐश्वर्या राय हिला अनफाॅलो केले. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामधील वाद वाढताना दिसतोय, यांचा वाद हा टोकाला गेल्याचे बघायला मिळतंय.
बॉलीवूडच्या लोकप्रिय जोडप्यांपैकी एक असलेल्या ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या संदर्भात एक शॉकिंग न्यूज समोर आली आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक विभक्त झाल्याची चर्चा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही चर्चा होती, अशातच अमिताभ बच्चन यांनी आपल्या सुनेला सोशल मीडियावरून अनफॉलो केल्याचे बोलले जात आहे.
ऐश्वर्या आता बच्चन कुटुंबियांसोबत राहत नसल्याची चर्चा आहे. बच्चन कुटुंबाच्या जवळच्या व्यक्तीने ऐश्वर्या बच्चन कुटुंबापासून वेगळी राहत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा लवकरच घटस्फोट होणार असल्याची जोरदार चर्चा असतानाच आता मोठी माहिती पुढे आलीये. रिपोर्टनुसार ऐश्वर्या राय बच्चन हिने अभिषेक बच्चन याचे घर सोडले आहे.
घटस्फोटाच्या अगोदरच अभिषेक याच्या घरातून ऐश्वर्या राय ही बाहेर पडलीये. ऐश्वर्या राय आणि अभिषेक यांच्या नात्यावर दुरावा आलाय.ऐश्वर्या राय ही अभिषेक बच्चन याचे घर सोडून तिच्या आईच्या घरी राहण्यास गेल्याचे रिपोर्टमध्ये सांगितले गेले आहे.
काही दिवसांपासूनच ऐश्वर्या राय ही तिच्या आईच्या घरी राहत आहे. आता जवळपास हे निश्चित दिसत आहे की, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यामध्ये सर्वकाही सुरळीत नक्कीच नाहीये.
ऐश्वर्या राय ही तिच्या आईच्या घरी राहण्यास गेल्याचे कळाल्यापासून चाहत्यांना देखील मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा खरोखरच घटस्फोट होणार का हा प्रश्न सातत्याने विचारला जातोय. आता यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोण काय भाष्य करते याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
ऐश्वर्या राय हिचे सासू जया बच्चनसोबत अजिबातच जमत नसल्याचे सांगितले जाते. हेच नाही तर असेही सांगितले जाते की, जया बच्चन आणि ऐश्वर्या राय या गेल्या कितीतरी दिवसांपासून एकमेकींना बोलत नाहीत.
ननंद श्वेता बच्चन हिच्यासोबत देखील ऐश्वर्या राय हिचे संबंध अजिबातच चांगले नाहीत. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या राय हिची तक्रार करताना श्वेता बच्चन ही दिसली होती. ऐश्वर्या राय हिच्या वाईट सवयींबद्दल बोलताना श्वेता बच्चन दिसली होती.
‘झूम’च्या वृत्तानुसारनुसार, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. दोघेही आजपर्यंत एकत्र होते ते फक्त त्यांच्या मुलीमुळे. पण आता परिस्थिती इतकी बिघडली आहे की, दोघांचे वैयक्तिक आयुष्यही मीडिया समोर आलं आहे.
ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबाच्या घरापासून दूर राहत असल्याचा दावाही या वृत्तात करण्यात आला आहे. ऐश्वर्या ही सध्या तिच्या आईसोबत राहत आहे, असं बोललं जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
वृत्तात सांगण्यात आलं आहे की, तिच्या जवळच्या लोकांचे म्हणणे आहे की आता अभिनेत्री तिच्या आईसोबत जास्त वेळ घालवते. याशिवाय ऐश्वर्या आणि तिची सासू म्हणजेच जया बच्चन यांच्यात अबोला निर्माण झाला आहे. दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत.
सासू-सुनेच्या या भांडणात अभिषेक चांगलाच अडकला आहे. एकीकडे त्याच्यावर पत्नी आणि मुलीची जबाबदारी आहे आणि दुसरीकडे त्याच्या आईवडिलांबद्दल प्रेम आणि कर्तव्य आहे. अशातच हे दोघे खरंच विभक्त झाले आहेत का? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.