महाराष्ट्रातील 122 कोटींच्या घोटाळ्यात अडकलेल्या बँकेने केले अभिनेत्री प्रिती झिंटाचे कर्ज माफ
Bank involved in Rs 122 crore scam in Maharashtra waives off actress Preity Zinta's loan

लाखो ग्राहकांच्या जीवाला घोर लावणाऱ्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेचे एक एक कारनामे समोर येत आहेत. सामान्य ठेवीदारांच्या बळावर वाढलेल्या बँकेत 122 कोटींचा घोटाळा झाला असून आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे.
या बँकेने अभिनेत्री प्रीती झिंटाला देखील कर्जमाफी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून आरोपींची चौकशी सुरू असून त्यातून नवीन धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत.
घोटाळ्यात अडकलेल्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेकडून बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने 18 कोटींचे कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडण्यासाठी बँकेने
प्रीती झिंटाला 1.55 कोटींची कर्जमाफी दिली होती. बँकेने या रक्कमेला बँकेने नॉन-परफॉर्मिंग अॅसेट (एनपीए) म्हणून वर्गीकृत केले होते. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली.
‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला एका अधिकाऱ्याने सांगितले की, प्रीती झिंटाला 2011 मध्ये कर्ज मंजूर झाले होते. त्यानंतर अभिनेत्री प्रीतीने हे कर्ज एप्रिल 2014 मध्ये फेडले.
मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याची चौकशी करत आहे. या प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
यामध्ये बँकेचे माजी महाव्यवस्थापक आणि लेखा प्रमुख हितेश मेहता यांचाही समावेश आहे. हितेश मेहता यांना 15 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती.
तपास अधिकाऱ्यांनी 2010 पासून बँकेच्या कर्जाच्या डेटाची तपासणी केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, “अभिनेत्री प्रीती झिंटा हिने बँकेकडून कर्ज घेतले होते. 7 जानेवारी 2011 रोजी प्रीतीला 18 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले.
या कर्जासाठी प्रीतीने तिच्या काही मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवली होती. यामध्ये मुंबईतील एक फ्लॅट आणि शिमला मधील मालमत्तेचा समावेश होता. या मालमत्तेची किंमत 27.41 कोटी इतकी होती. नोव्हेंबर 2011 मध्ये प्रीतीने बँकेला 11.40 कोटींची परतफेड केली.
वेळेवर कर्ज न भरल्यामुळे 31 मार्च 2013 रोजी तिचे कर्ज खाते ‘अ’ श्रेणीत वर्गीकृत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी ‘अ’ रक्कम 11.47 कोटी रुपये होती.
“त्यानंतर बँकेने कर्जाच्या अंतिम सेटलमेंटवर 1.55 कोटी रुपयांची सूट देऊ केली,” असे अधिकाऱ्याने सांगितले. उर्वरित कर्जाची रक्कम तिने 5 एप्रिल 2014 रोजी परत केली.
दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेचे (EOW) शुक्रवारी मुंबईतील कलिना येथील फॉरेन्सिक सायन्स लॅब (FSL) मध्ये प्रकरणातील मुख्य आरोपी हितेश मेहताची ब्रेन मॅपिंग चाचणी करणार आहे
जेणेकरून पैशाच्या गुन्ह्याबद्दल आणि इतर आरोपींच्या सहभागाबद्दल अधिक माहिती गोळा करता येईल. पोलिसांनी यापूर्वी मेहताची पॉलीग्राफ चाचणी केली होती, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.