अभिषेक बच्चन – ऐश्वर्या रॉय घटस्फोटाच्या उंबरठ्यावर ?अभिताभ बच्चननी घेतला मोठा निर्णय?

Abhishek Bachchan - Aishwarya Roy on the verge of divorce?

 

 

 

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचं कुटुंब सध्या चांगलंच चर्चेत आहे. अमिताभ आणि त्यांची पत्नी जया बच्चन यांना दोन मुलं आहेत. त्या दोघांनी त्यांच्या मुलांना चांगले संस्कार दिलेत.

 

 

अभिषेकनं ऐश्वर्या रायशी लग्न केलं. त्यांना एक मुलगी असून आराध्या बच्चन आहे. दुसरीकडे श्वेतानं बिझनेसमॅन निखिल नंदाशी लग्न केलं आणि त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा असून नव्या नवेली नंदा आणि अगस्त्य नंदा अशी त्यांची नावं आहेत,

 

 

नुकताचं अमिताभ बच्चन यांनी त्यांची लेक श्वेता बच्चनला त्यांचं पहिलं घर म्हणजेच प्रतीक्षा बंगला भेट केला. ‘इकोनॉमिक टाइम्स’ नं दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, 8 नोव्हेंबर 2023 ला अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी साइन केली होती

 

 

 

आणि त्यांनी स्टॅम्प ड्युटीसाठी तब्बल 50.65 लाख रुपये खर्च केले. रिपोर्ट्सनुसार, हे देखील समोर आलं आहे की एकूण 16,840 स्क्वेअर फूट मोठा असा हा बंगला आहे. या बंगल्याची किंमत ही 50.63 कोटी आहे.

 

 

अमिताभ बच्चन यांनी त्यांचं घर लेक श्वेता बच्चनला भेट केला आहे. नेटकऱ्यांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा सुरु आहे की ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात काही ठीक नाही आहे.

 

 

दोघं एकत्र दिसत नाही आहेत. अभिषेक ऐश्वर्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत देखील नव्हता. आता सोशल मीडिया रेडिटवर एका रिपोर्टचा स्क्रीनग्रॅब शेअर केला आहे. यात ऐश्वर्या आणि अभिषेकच्या विभक्त होण्याच्या चर्चांमध्ये अमिताभ यांना इतका मोठा निर्णय घेतला.

 

 

 

दरम्यान, नेटकऱ्यांनी अमिताभ बच्चन यांनी त्यांचं पहिलं घर लेक श्वेता बच्चनच्या नावावर करण्याच्या निर्णयावर रिअॅक्ट केलं आहे. इतकंच नाही तर ते अंदाज लावत आहेत की जर ऐश्वर्या अभिषेकला घटस्फोट देईल

 

 

आणि पोटगी मागेल या विचारानं अमिताभ हे संपत्ती वाटण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरा नेटकरी म्हणाला की ‘मला वाटतं की जरी ऐश्वर्या आणि अभिषेक विभक्त झाले,

 

 

तरी ऐश्वर्या अशा लोकांपैकी एक आहे जी एलिमनी म्हणजेच पोटगी घेणार नाही.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘घटस्फोटाचा खुलासा.’

 

 

ऐश्वर्या राय विषयी बोलायचे झाले तर 1 नोव्हेंबर रोजी तिनं 50 वा वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवसानिमित्तानं तिला जगभरातून चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या.

 

 

ऐश्वर्याच्या वाढदिवसानिमित्तानं अभिषेकनं सोशल मीडियावर तिचा एक मोनोक्रॉम फोटो शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या होत्या. अभिषेकनं शेअर केलेल्या फोटोत तो नव्हता आणि त्या फोटोमुळे देखील त्यांच्या विभक्त होण्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *