बॉलिवूड अभिनेत्री जयाप्रदा फरार ? अटकेसाठी पोलिसांच्या धाडी ;पहा काय आहे प्रकरण ?

Bollywood actress Jayaprada absconding? Police rush to arrest; see what is the case?

 

 

 

 

अभिनेत्री आणि माजी खासदार जयाप्रदा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता भंग केल्याच्या दोन प्रकरणांमध्ये त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करूनही जया कोर्टात हजर राहिल्या नाहीत.

 

 

यामुळे पोलिसांनी जयाप्रदाच्या स्थानिक ठिकाणांवर तसेच दिल्ली आणि मुंबईतील तिच्या ठिकाणांवर छापे टाकले. परंतु अजुनही जया यांचा शोध पोलिसांना लागला नाही.

 

 

जया प्रदा यांना ताब्यात घेऊन 10 जानेवारीला त्यांना न्यायालयात हजर करण्याचे आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे. जयाप्रदा यांनी २०१९ मध्ये रामपूरमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.

 

 

त्यावेळी स्वार आणि केमरी पोलीस ठाण्यात निवडणूक आचारसंहिता भंगाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला होता.

 

 

स्वार येथे दाखल झालेल्या गुन्ह्यात, आचारसंहिता लागू असतानाही 19 एप्रिल रोजी नूरपूर गावात एका रस्त्याचे उद्घाटन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

 

 

 

दुसरी घटना केमरी पोलीस ठाण्यातील आहे. यामध्ये पिपलिया मिश्रा गावात आयोजित जाहीर सभेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

 

 

 

या दोन्ही प्रकरणांचा पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी खासदार-आमदार विशेष न्यायालयात (मॅजिस्ट्रेट ट्रायल) सुरू आहे.

 

 

या प्रकरणांमध्ये जयाप्रदा गेल्या अनेक तारखांपासून न्यायालयात हजर होत नव्हत्या. त्यावरून त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. यासोबतच न्यायालयाने पोलीस अधीक्षकांना एक पथक तयार करून जया प्रदांना अटक करण्याचे निर्देश दिले होते.

 

 

 

न्यायालयाच्या सूचनेनंतर पोलीस अधीक्षक राजेश द्विवेदी यांनी एक पथक दिल्ली आणि मुंबईला पाठवले. या टीमने जया प्रदा यांच्या शोधात दिल्ली आणि मुंबईत अनेक ठिकाणी छापे टाकले पण त्यांना यश मिळू शकले नाही.

 

 

पोलिसांच्या झटपट छाप्यामुळे जयाप्रदा आणि त्यांचे कर्मचारी घाबरले आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे मोबाईल बंद केले आहेत, त्यामुळे पोलिसांना त्यांचा शोध घेण्यासाठी खुप वेळ लागत आहे.

 

 

 

याशिवाय पोलिसांचे विशेष पथक रामपूर येथील जयाप्रदा यांच्या नर्सिंग कॉलेजमध्येही पोहोचले होते. जिथून जया प्रदा यांच्या कार्यालय आणि घराची माहिती गोळा करण्यात आली.

 

 

पोलीस जयाप्रदाच्या शोधात रात्रंदिवस झटत असले तरी त्या न सापडल्याने व कर्मचाऱ्यांचे मोबाईल बंद असल्याने तिला आणून १० जानेवारीला न्यायालयात हजर करणे पोलिसांसमोरील एक मोठे आव्हान आहे.

 

 

पोलिस अधीक्षक राजेश द्विवेदी म्हणाले की, “न्यायालयाच्या आदेशानुसार जया प्रदा यांना आणण्यासाठी एक टीम तयार करून दिल्ली आणि मुंबईला पाठवण्यात आली आहे.

 

 

त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे मोबाईल बंद केले आहेत. ही टीम नर्सिंग कॉलेजमध्येही गेली होती, मात्र अद्याप जया प्रदा यांचा शोध लागला नाही.”

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *