प्राजक्ता माळी म्हणाल्या एका कार्यक्रमात सत्कार करत असताना आमची झालेली भेट आणि …..
Prajakta Mali said that we met while giving a felicitation at an event and .....

महाराष्ट्रातील राजकारण्यांना अशा प्रकारची भाषा शोभत नाही; असे सांगत सुरेश धस यांनी माझी माफी मागावी, अशी मागणी अभिनेत्री प्राजक्ता माळीने शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
या प्रकरणी आपण महिला आयोगाकडे तक्रार केल्याचे प्राजक्ताने सांगितले. तसेच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालावे अशी विनंती तिने केली. या पत्रकार परिषदेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
धस यांनी जे काही वक्तव्य केले त्याचा निषेध करण्यासाठी मी इथे आली आहे. गेली अनेक दिवस मी हे सर्व शांतपणे सहन करत आहे. मात्र माझी शांतता म्हणजे मुकसंमती आहे असे नाही.
कलाकारांची शांतता म्हणजे हतबलता आहे, असे प्राजक्ताने सांगितले. मी शांत बसले कारण मला चिखलफेकीत पडायचे नव्हते.
ही विषय इतकी खोटी आहे ज्याला काही आधार नाही. एका कार्यक्रमात सत्कार करत असताना आमची झालेली भेट आणि
तेव्हा काढलेला फोटो त्यामुळे मी यात पडले नाही. या काळात माझ्या कुटुंबियांनी आणि चित्रपट क्षेत्रातील मित्रांनी साथ दिल्याचे प्रजक्ताने सांगितले.
आज ही वेळ येते ही नामुष्की आहे. आज एक लोकप्रतिनिधी यावर बोलतात त्यामुळे मला बोलावे लागते. धस त्यांनी असे वक्तव्य केल्यामुळे मला समोर यावे लागले. एखादा लोकप्रतिनिधी असे बोलतो तेव्हा ते गंभीर होते.
तुमच्या राजकारणात तुम्ही आम्हाला का आणता असा प्रश्न यावेळी प्राजक्ता माळीने विचारला. बीडमध्ये कधी पुरुष कलाकार गेला नाही का? फक्त महिला कलाकार जातात का? असा सवाल तिने उपस्थित केला.
पण धस यांनी तसे केले नाही. त्यांनी स्वत:चा टीआरपी वाढवण्यासाठी, स्वत:च्या फायद्यासाठी अनेक महिलांची नावे घेतली. एका फोटोवरून तुम्ही कोणाबद्दल काहीही बोलणार का? अशा प्रकारचे वक्तव्य करुन तुम्ही स्वत:ची मानसिकता दाखवता असे तिने सांगितले.
राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचे नाव घेतले होते. दरम्यान प्राजक्ता ताईंबद्दल
मी काहीही चुकीचे वक्तव्य केले नाही. त्यांना कुठेही तक्रार करायची असेल तर त्या करू शकतात अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली आहे.
धनंजय मुंडे यांच्या भूमिकेबाबत आणि राजकारणाबाबत सुरेश धस यांना विचारले असता, “धनुभाऊंकडे गत पाच वर्षात एवढे पैसे कुठून आले? काय ते सांस्कृतिक कार्यक्रम..! रश्मिका मंदाना, लै कंबर हलवते ती सपना चौधरी,
अलीकडे प्राजक्ता ताई माळीही परळीला यायला लागली आहे. ज्यांना कुणाला इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स करायचे असेल त्यांनी परळीत यावे,
येथून शिक्षण घ्यावे आणि देशभरात जाऊन त्याचा प्रचार प्रसार करावा,” अशी उपहासात्मक टीका सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजकारणावर केली.
दरम्यान, या प्रकरणी आता प्राजक्ता माळीने कठोर पाऊल उचललं आहे. तिने सुरेश धस यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार नोंदवली आहे. प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत याबाबत तिचं मत मांडत आहे.
प्राजक्ता म्हणाली, “मी या आधीही हजारो नेते आणि मान्यवरांसोबत फोटो काढले आहे. मग त्यांच्यासोबत नाव जोडणार का? हे खूपच कुस्थित आहे. कोणता पुरुष कलाकार परळीला आला नाही का.
कोणतीही महिला कोणत्याही पुरुषाच्या, राजकारण्याच्या आधाराशिवाय मोठी होऊ शकत नाही का. तुमच्या वैयक्तिक राजकारणासाठी तुम्ही फिल्म क्षेत्रातील महिलांच्या नावांचा वापर करणे बंद करावा.
हे वागणं महाराष्ट्रातील राजकारण्यांना शोभत नाही. इतक्या कुस्थितपणे आमची खिल्ली उडवली आणि हशा पिकवला, त्यांनी आमची जाहीर माफी मागावी. महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.”