बीडच्या घटनेत आता अभिनेत्रीचा वाद

Suresh Dhas said, 'Prajakta will not apologize to Mali'

 

 

 

राज्यातील राजकारणात बीड जिल्हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या प्रकरणात वाल्मिकी कराड मास्टरमाईंड असल्याचे सांगितले जात आहे.

 

हा वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध असल्याचा राजकीय आरोप होत आहे. त्यामुळे विरोधक धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. त्यासंदर्भात भाजप आमदार सुरेश धस यांनी

 

माध्यमांशी बोलताना अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचे नाव घेतले होते. त्यामुळे प्राजक्ता माळी यांनी मुंबईत शनिवारी पत्रकार परिषद घेतली.

 

त्यात त्यांनी सुरेश धस यांनी आपली माफी मागावी, अशी मागणी केली. परंतु सुरेश धस यांनी माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला.

 

तसेच प्राजक्ता माळी यांचा निषेध म्हणून आजपासून हास्यजत्रा पाहणार नाही, अशी घोषणा केली.

 

प्राजक्ता माळी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर आमदार सुरेश धस म्हणाले, राज्यात जे आता चालले आहे,

 

त्याला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्राजक्ता माळी यांनी माझा निषेध केला आहे. त्यांनी माझे वाक्य परत पहावी.

 

त्यात काहीच आक्षेपार्ह नाही. माझ्या दृष्टिने प्राजक्ता माळी यांचा विषय संपला. राजकारणात त्यांना खेचण्याचा संबंध नाही.

 

त्या माझ्या शत्रू नाही. त्यांनी माझा निषेध केला असेल तर मी सुद्धा निषेध म्हणून हास्यजत्रा पाहणे बंद करणार आहे, असे सुरेश धस यांनी म्हटले.

आमदार सुरेस धस यांनी म्हटले की, मी प्राजक्ता माळी यांची माफी मागणार नाही. माणूस आमचा गेला आहे. ज्याचे जळत त्यांना कळते.

 

विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांचे आणि कोणाचे संबंध असे बोललो असेल तर संबंध शब्द परत घेतो. मैत्रीतून त्यांनी हे केले असावे. माझी चूक झाली नसल्याने मी माफी मागणार नाही.

 

प्राजक्ता माळी यांना कोणीतरी पत्रकार परिषद घ्यायला लावली की काय? अशी शंका मला आहे, असे आमदार सुरेश धस यांनी म्हटले.

 

ते म्हणाले, मला टेक्निकल नॉन टेक्निकल सगळे माहिती आहे. राजकारणात कोणाची तरी कोंडी झाली आहे. ती फोडण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतली आहे.

 

भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळींसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद पेटलाय. अभिनेत्री प्राजक्तानं धस यांच्याविरोधात महिला आयोगात धाव घेतली आहे.

 

धस यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांनी माझी जाहीर माफी मागावी, अशी मागणी प्राजक्तानं केलीय. सुरेश धस यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांनी समस्त महिलांचा अपमान केल्याचा आरोपही प्राजक्ता माळीनं केलाय.

 

मात्र, आपण प्राजक्ता माळी यांची माफी मागणार नसल्याचं प्रत्युत्तर सुरेश धस यांनी दिलंय. आपण काहीच आक्षेपार्ह बोललो नसल्याचा दावा धस यांनी केलाय.

 

इतकंच नाही तर संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचा आरोपही धस यांनी केलाय.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचंही प्राजक्ता माळीनं सांगितलंय. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यांसदर्भात कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचंही प्राजक्ता माळीनं म्हटलंय.

 

बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. भाजप आमदार सुरेश धस यांनी याप्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केलेत. याविषयी बोलतानाच सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्त माळीच्या नावाचा उल्लेख केला होता.

 

धस यांच्या याच वक्तव्यावरून प्राजक्ता माळी यांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. धस यांच्याविरोधात माळी यांनी महिला आयोगात धाव घेतली आहे. याप्रकरणात काय कारवाई होणार

 

हे पाहणं आता महत्त्वाचंय. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे हे तीन आरोपी फरार आहेत.

 

संतोष देशमुख हत्याप्रकरणी बीड जिल्ह्यात सर्वपक्षीय मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. आरोपींना अटक करता येत नसेल तर मंत्र्यांना अटक करून

 

आता टाकण्याची मागणीही मनोज जरांगे यांनी केली आहे बीडमधील संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणावर मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिलीय. आरोपी कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई होणारच. असं वक्तव्य शंभूराज देसाईंनी केलं.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *