सलमानखान सोबत लग्नाचे कार्डदेखील छापण्यात आले,पण लग्न झाले नाही, अभिनेत्रीची कबुली

A wedding card was also printed with Salman Khan, but the wedding did not take place, the actress confessed.

 

 

 

बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या प्रेमकरणाची संपूर्ण देशात चर्चा आहे.

 

90 च्या दशकात हे दोघेही चांगलेच चर्चेत होते. हे दोघे एकमेकांत एवढे गुंतले होते की ते लग्नदेखील करणार होते.

विशेष म्हणजे त्यांच्या लग्नाच्या पत्रिकाही छापण्यात आल्या होत्या. मात्र त्यांचे लग्न होऊ शकले नाही.

दरम्यान, संगीता बिजलानीने सलमान खानसोबतच्या रिलेशनशीबाबत मोठे आणि धक्कादायक खुलासे केले आहेत.

 

सलमान खान तिला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करायचा. तिला शॉर्ट ड्रेस परिधान करण्यास सलमान मज्जाव करायचा, असा धक्कादायक खुलासा संगीताने केला आहे.

 

संगीता बिजलानीने नुकतेच इंडियन आयडॉल या रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर तिने चांगलीच धम्माल केली.

 

विशेष म्हणजे तिने सलमान खानसोबतच्या रिलेशनशीपबाबतही अनेक खुलासे केले. हे खुलासे करताना तिने सलमान खानचे कुठेही नाव घेतले नाही.

 

पण तिचा इशारा सलमान खानकडेच होता. याच कार्यक्रमात एका स्पर्धकाने संगीता बिजलानीला काही प्रश्न विचारण्यात आले.

 

तुम्हाला तुमच्या करिअरमधील कोणता निर्णय बदलायला आवडेल? तसेच तुम्ही सलमान खानसोबत लग्न करणार होत्या,

 

तुमच्या लग्नाचे कार्डदेखील छापण्यात आले होते? पण मग नेमकं काय घडलं? तुमचं लग्न का होऊ शकलं नाही? असे संगीताला विचारण्यात आले.

यावर बोलताना आमच्या लग्नाचे कार्ड छापण्यात आले होते, हे खरे आहे, असे संगीताने सांगितले.

 

सोबतच माझा एक्स बॉयफ्रेंड मला छोटे कपडे घालण्यापासून मज्जाव करायचा. हे कपडे परिधान नको करू,

 

ते कपडे परिधान नको करू असे मला सांगितले जायचे. मी शॉर्ट ड्रेस परिधान करू शकत नव्हते. सुरुवातीला मी ते केले.

 

पण आता नंतर मी ते बंद केले, असे संगीताने सांगितले. मला माझ्या आयुष्यातील हा भाग बदलायला आवडेल.

 

खरं म्हणजे मला तो भाग बदलायचाही नाही. कारण मी आता स्वतंत्र आहे, असे संगीताने सांगितले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *