माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणेंचे नाव वापरून 45 लाखांची फसवणूक

Former Chief Minister Kha. 45 lakhs fraud using the name of Narayan Rane

 

 

 

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या नावाचा वापर करून अंधेरीतील

 

एका 51 वर्षीय महिलेच्या मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्याच्या नावाखाली तिची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

 

महिलेने वर्सोवा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी मेघना सातपुते, नितेश पवार, सावंत काका आणि राकेश गावडे यांच्यावर

 

फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. वैद्यकीय महाविद्यालायत प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली या महिलेकडून आरोपीनी 45 लाख रुपये उकळल्याचे आरोप महिलेने तक्रारीत केले आहे.

 

पीडित महिला खासगी रुग्णालयात वैद्यकीय सहाय्यक म्हणून काम करतात. त्यांची 23 वर्षीय मुलगी,

 

जिने ऑक्टोबर 2020 मध्ये नीट परीक्षेत 315 गुण मिळवले, ती सध्या बंगळुरूमध्ये बीएचएमएसच्या पहिल्या वर्षात शिकत आहे.

तक्रारीनुसार, मार्च 2021 मध्ये मुलीच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी प्रयत्न करत असताना तक्रारदार महिलेची भेट तिच्या जुन्या मैत्रिणी मेघना सातपूतेशी झाली.

 

सातपूतेने तक्रारदार महिलेची भेट नितेश पवार व राकेश गावडे यांच्याशी करून दिली. त्यावेळी दोघांनी सिंधुदुर्गातील एका वैद्यकीय शाळेचे विश्वस्त असल्याचे सांगितले.

 

तक्रारदार महिलेच्या मुलीला व्यवस्थापन कोट्यातून वैद्यकीय महाविद्यालायत प्रवेश देण्याचे आमिष दाखवले आणि त्यासाठी 15 लाख रुपयांची मागणी केली.

 

ती रक्कम देण्यासाठी तक्रारदार महिला तयार झाली. पण त्यानंतरही तक्रारदार महिलेच्या मुलीला प्रवेश मिळाली नाही.

 

कोरोनामुळे टाळेबंदी आली असताना त्यांनी सर्व नियम बदल्यामुळे प्रवेशासाठी आता लाख रुपये लागतील, असे सांगितले.

अॅडमिशनच्या नावाखाली महिलेने आरोपींना 45 लाख रुपये दिले. त्यानंतरही डिसेंबर 2021 मध्ये महाविद्यालय सुरू होईल.

 

मात्र, त्यांनी कोणतेही कागदपत्र किंवा प्रवेश पत्र दिले नाही. म्हणून तक्रारदार महिलेला संशय आला.तिने वैद्यकीय महाविद्यालयाशी संपर्क साधला.

 

त्यावेळी त्यांच्या मुलीला महाविद्यालयात प्रवेश मिळाला नसल्याचे समजले. त्यावेळेपासून तक्रारदार महिला आरोपींना संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती,

 

मात्र सर्वांनी त्यांचे मोबाईल मोबाईल बंद येत होती. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने वर्सोवा पोलिस ठाणे गाठत

 

आरोपींविरोधात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *