मंत्रिपदासाठी या इच्छुकांनी सुरु केली लॉबिंग , मंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार

These aspirants have started lobbying for the ministerial post, on whose neck will the garland of the ministerial post fall?

 

 

 

महायुतीनं प्रचंड बहुमत मिळवून महाराष्ट्रात सत्ता मिळवलीय. महायुतीचे विक्रमी आमदार निवडून आलेत. साहजिकच मंत्रिपदासाठी इच्छुकांची गर्दीही वाढलीय.

 

महायुतीच्या तिन्ही पक्षात मंत्रीपदासाठी इच्छुकांची भलीमोठी रांग लागलेलीये. काही जुन्या मंत्र्यांचा पत्ता कट करून अनेक नव्या चेह-यांना मंत्रीमंडळात समाविष्ट करून घेण्याची शक्यता आहे.

 

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह राज्यभरातून अनेक इच्छूकांनी पक्षश्रेष्ठींकडे इच्छा बोलून दाखवली आहे. विदर्भातील अनेक आमदार मंत्रीपदासाठी इच्छूक आहेत.

 

मराठवाड्यातही महायुतीला मोठं यश मिळालं. त्यामुळे मंत्रीपदासाठी अनेकांनी लॉबिंग सुरू केलीय. अनेक आमदारांनी मंत्रीपदासाठी देव पाण्यात बुडवून ठेवलेत.

 

पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला यश अपेक्षित होतं मात्र इथंही महायुतीनं जोरदार कामगिरी केली आहे. त्यामुळे मंत्रीपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळत आहे.

 

कोकणातूनही अनेकांनी मंत्रीपदासाठी फिल्डिंग लावली आहे. एकनाथ शिंदेंची भेट घेऊन शिवसेनेच्या नेत्यांनी मंत्रीपदासाठी लॉबिंग सुरू केल्याची माहिती आहे.

 

कोकणातून मंत्रीपदाकडे डोळे लावून बसलेल्यांमध्ये, उत्तर महाराष्ट्रामधूनही मंत्रिपदासाठी इच्छुकांची गर्दी आहे. मंत्रीपद मिळावं यासाठी अनेक आमदारांनी वरिष्ठांना गळ घातली आहे.

 

मुख्यमंत्री कोण होणार यावरून महायुतीत जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच महायुतीच्या तिन्ही पक्षातून मंत्रीपदासाठी अनेकांनी देव पाण्यात बुडवून ठेवलेत. आता अखेर मंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

उत्तर महाराष्ट्रातून मंत्रिपदासाठी इच्छुक
दादा भुसे, शिवसेना
छगन भुजबळ, राष्ट्रवादी
राहुल आहेर, भाजप

 

सीमा हिरे, भाजप
देवयानी फरांदे, भाजप
माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादी

 

गुलाबराव पाटील, शिवसेना
गिरीश महाजन, भाजप
सुरेश भोळे, भाजप

मंगेश चव्हाण, भाजप
संजय सावकारे, भाजप
जयकुमार रावल, भाजप

 

विजयकुमार गावित, भाजप
राधाकृष्ण विखे, भाजप
संग्राम जगताप, राष्ट्रवादी

 

आशुतोष काळे, राष्ट्रवादी
चंद्रशेखर बावनकुळे,भाजप
आशिष जयस्वाल, रामटेक, शिवसेना

कृष्णा खोपडे, भाजप
सुधीर मुनगंटीवार, भाजप
धर्मरावबाबा आत्राम, राष्ट्रवादी

संजय राठोड, शिवसेना
इंद्रनील नाईक, राष्ट्रवादी
बंटी भांगडीया, भाजप

धर्मरावबाबा आत्राम, राष्ट्रवादी
रणधीर सावरकर, भाजप
प्रकाश भारसाकळे, भाजप

अशोक उइके, भाजप
इंद्रनील नाईक, राष्ट्रवादी
रवी राणा, युवा स्वाभिमान

 

नरेंद्र भोंडेकर, शिवसेना
परिणय फुके, भाजप
संजय कुटे, भाजप

 

पश्चिम महाराष्ट्रातून मंत्रिपदासाठी इच्छुक
हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी
प्रकाश आबिटकर, शिवसेना
राजेश क्षीरसागर, शिवसेना

समाधान आवताडे, भाजप
सुरेश खाडे, भाजप
गोपीचंद पडळकर, भाजप

सुधीर गाडगीळ, भाजप
सुहास बाबर, शिवसेना
शिवेंद्रराजे भोसले, भाजप

मकरंद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
जयकुमार गोरे,भाजप
महेश शिंदे,शिवसेना
शंभुराज देसाई, शिवसेना

 

कोकणातून मंत्रिपदासाठी इच्छुक
भरत गोगावले, शिवसेना
दीपक केसरकर, शिवसेना

नितेश राणे, भाजप
उदय सामंत, शिवसेना

शेखर निकम, राष्ट्रवादी
योगेश कदम, शिवसेना, यांचा समावेश आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *