भाजपने उमेदवारी देण्यापूर्वीच नितीन गडकरींना बिनविरोध खासदार करण्याच्या हलचाली
The move to make Nitin Gadkari an unopposed MP even before the BJP nominated him

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री यांना अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीकडून त्यांना ऑफर देण्यात आली आहे.
त्या ऑफरला भाजपकडून उत्तर देण्यात आले आहे. भाजपचे महाराष्ट्रातील जागावाटप अद्याप जाहीर झालेले नाही. यामुळे नितीन गडकरी यांची उमेदवारी अद्याप जाहीर केली गेली नाही.
नितीन गडकरी यांच्या कामांचे विरोधी पक्षाकडून अनेक वेळा कौतूक झाले आहे. आता हाच मुद्दा हेरुन नागपूरकर नितीन गडकरी यांची लोकसभा निवडणूक बिनविरोध करण्याच्या मागणीसाठी पुढे सरसावले आहे.
नागपुरातील काही सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रत येत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली आहे.
नागपुरातच नाही तर देशातही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे लोकाभिमुख काम करत आहेत. यामुळे त्यांना बिनविरोध लोकसभेत खासदार म्हणून पाठवा, अ
शी मागणी करणारे फलक नागपुरात सामाजिक संघटनांचे दिसत आहेत. नागपुरातील लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ उभे राहत ही मागणी करण्यात आली आहे.
विरोधकही गडकरींच्या कामच कौतुक करत असल्यानं त्यांनीही उमेदवार उभा न करता बिनविरोध निवडून द्यावे. विरोधी पक्षातील लोकांना भेटून त्यांना आम्ही यासंदर्भात समजावून सांगण्याचा प्रयत्न करू,
असे सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी दत्ता शिर्के यांनी सांगितले. अनेक सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी एकत्र येऊन विरोधी नेत्यांकडे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना शिवसेना उबाठा पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी खुली ऑफर दिली होती. महाविकास आघाडीत या आम्ही तुम्हाला निवडून आणू.
त्यावर मंगळवारी नितीन गडकरी यांनी जोरदार टीका केली होती. गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांची ऑफर फेटाळत, हे अपरिपक्ततेचे लक्षण असल्याचे म्हटले आहे.
भाजपमध्ये तिकीट देण्याची एक पद्धत आहे. उद्धव ठाकरे यांनी माझ्या तिकिटाची चिंता करु नये, असे गडकरी यांनी म्हटले होते.
दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पक्षप्रवेशाची ऑफर दिली आहे.
जर भाजपात तुमचा अपमान होत असेल तर तुम्ही महाविकास आघाडीत प्रवेश करा अशी जाहीर ऑफरच उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरींनी दिली आहे.
तुम्ही महाविकास आघाडीत आल्यास विरोधी पक्ष लोकसभा निवडणुकीत तुमच्या विजयाची खात्री करेल असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
पण नितीन गडकरी यांनी हे बालिश आणि हास्यास्पद असल्याचं म्हणत ऑफर नाकारली आहे. यानंतर संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरे यांनी यवतमाळमधील रॅलीत बोलताना म्हटलं होतं की, “कृपाशंकर सिंग यांच्यासारखे लोक ज्यांना भाजपाने कधीकाळी टार्गेट (भ्रष्टाचार प्रकरणी) केलं होतं. त्यांचं नाव पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पहिल्या यादीत जाहीर केलं जातं. पण नितीन गडकरी यांचं नाव मात्र गायब आहे”.
“मी दोन दिवसांपूर्वी नितीन गडकरींना म्हणालो होतो आणि आता पुनरुच्चार करत आहे. जर तुमचा अपमान होत असेल तर भाजपाला सोडा
आणि महाविकास आघाडीत सहभागी व्हा. आम्ही तुमच्या विजयाची खात्री करु. आमचं सरकार येईल तेव्हा आम्ही तुम्हाला मंत्री करु. या पदासह मोठी शक्तीही मिळेल,” असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.
नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरेंची ऑफर नाकारली असून हे फार अपरिपक्व असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी तिकीट वाटपासाठी भाजपाच्या प्रस्थापित व्यवस्थेवर भर दिला.
“उद्धव ठाकरेंचा सल्ला अपरिपक्व आणि हास्यास्पद आहे. भाजपमध्ये उमेदवारांना तिकीट देण्यासाठी एक पद्धत आहे,” असं गडकरी यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले.
“आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या. दिल्लीतील मराठी माणसाचा अवमान होऊ नये, तो आम्हाला सहन झाला नाही. मराठी माणसाला अवमान सहन करण्याची सवय नाही.
त्यामुळे हे वक्तव्य केलं असेल तर चुकीचं आणि बालिश काय? तुम्ही वारंवार अपमान सहन करताय याचं आम्हाला दु:ख आहे,” असं संजय राऊत म्हणाला आहेत.
दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली होती. जणू काही रस्त्यावरील व्यक्ती एखाद्याला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष करण्याची ऑफर देत आहे असं वाटत असल्याचं फडणवीस म्हणाले होते. नितीन गडकरी हे भाजपाचे प्रमुख नेते आहेत.
परंतु पहिल्या यादीत महाराष्ट्रातील नावांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. कारण भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा पूर्ण झालेली नाही, असं फडणवीस म्हणाले होते.