अजित पवारांच्या टीकेनंतर शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय
After Ajit Pawar's criticism, Sharad Pawar took a big decision
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी पडल्यानंतर अजित पवारांनी सातत्याने शरद पवारांच्या वयावर टीका करत आहे. अजित पवारांच्या या टीकेनंतर शरद पवारांनी निवडणूक न लढवण्याचा न मोठा निर्णय घेतला आहे.
खासदारकीची सध्याची टर्म संपल्यानंतर मी निवडणूक लढवणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
शरद पवार म्हणाले, माझी खासदारकी अडीच वर्षांनंतर संपत आहे. त्यानंतर मी निवडणूक लढणार नाही हे मी ठरवलं आहे. माझी खासदारकीची टर्म शिल्लक आहे.
त्यामुळं मी तोपर्यंत काम करत राहणार आहे. मला लोकांनी तिथं पाठवलंय तिथं मी काम करु नको का? माझ्या वयावर सातत्यानं बोललं जाते.
मी 1967 पासून राजकारणात आहे . माझ्या विरोधकांनीही कधी यावर टीका केली नाही. मी अनेक संस्थांचा आजीवन अध्यक्ष आहे . तिथं मी काम करत राहणार आहे.
राहुल नार्वेकर मुख्यमंत्री शिंदेंना भेटत असतील तर संशयाला जागा, राहुल नार्वेकरांनी प्रतिमा जपली पाहिजे. देवेंद्र फडणवीस उद्याच्या निकालानंतर सरकार स्थिर राहील असं जर म्हणत असतील
याचा अर्थ त्यांना निकालाबाबत माहिती आहे, असे शरद पवार म्हणाले. तसेच राहुल नार्वेकरांनी आपली प्रतिमा जपली पाहिजे, असा सल्ला शरद पवारांनी नार्वेकरांना दिला आहे.
राम श्रद्धेचा विषय आहे. पक्षांकडून कोणतही रामाबाबत वक्तव्ये केलेलं नाही. जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य पक्षाचं वक्तव्य नाही. मुंबईचे पालकमंत्री शाळांमध्ये रामाबाबत स्पर्धा घेण्यासाठी सक्ती करत आहेत हे योग्य नाही.
हा देश सेक्युलर देश आहे . मी गर्दीत रामाच्या दर्शनाला जाणार नाही. माझी राज्यसभेचा कार्यकाळ अडीच वर्षानंतर संपत आहे त्यानंतर जाईल, असे शरद पवार म्हणाले.
विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या ईडीच्या छापेमारीवर बोलताना शरद पवार म्हणाले, केंद्रातलं सरकार बदलत नाहीत तोवर असे छापे सुरूच राहणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये आमदार अपात्रतेसंदर्भात सुरु असलेल्या वादावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे 10 जानेवारी रोजी निकाल देणार आहेत.
मात्र या निकालापूर्वी नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याने ठाकरे गटाकडून आक्षेप नोंदवला जात आहे. असं असतानाच मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही यावर आक्षेप घेतला आहे.
पत्रकारांनी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील विषयावरुन नार्वेकर आणि शिंदेंची निकालाआधी भेट झाल्याचा संदर्भ देत प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार यांनी, “साधी सरळ गोष्ट आहे. ज्यांच्या बाबत केस आहे आणि जे निर्णय घेणार आहेत त्यांनी त्यांच्याकडे जाणं यामुळे संशयाला जागा आहेत,” असं म्हटलं.
राहुल नार्वेकरांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याचा संदर्भ देत बोलताना, “पदाचा मान राखण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष यांच्यावर आहे,” असं म्हटलं. तसेच पुढे बोलताना शरद पवारांनी, “देवेंद्र फडणवीस यांना कदाचीत उद्याच्या निकालाबाबत माहिती आसावी,” असंही सूचक विधान केलं.
राष्ट्रवादीचे चिन्ह आणि पक्षाबाबतच्या वादावर बोलताना शरद पवारांनी, “दोन्हीकडून बाजू मांडून झाल्या आहेत. पण निर्णय अद्याप आलेला नाही. आम्ही निकालाची वाट बघतोय,” असं सांगितलं.
परतीसाठीचे दरवाजे प्रमुख नेत्यांसाठी बंद आहेत, असं शरद पवार यांनी अजित पवारांसाठी परतीचे दोर कापले गेल्याचं सांगत केलं. तसेच शिवसेनेतील वादासंदर्भात विधानसभेच्या अध्यक्षांचा निकाल आल्यावर प्रतिक्रिया देणे योग्य होईल, असंही शरद पवार म्हणाले.
अजित पवारांकडून सातत्याने वयावरुन टीका होत असल्याच्या संदर्भातून बोलताना शरद पवारांनी, “प्रश्न वयाचा असेल तर खूप उदाहरण सांगता येतील. पण यावर जास्त काही बोलणार नाही. याला गांभीर्याने घ्यायची गरज नाही. त्याला नजर आंदाज करणे चांगले, असं उत्तर दिलं. “1967 पासून मी एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही,” असंही शरद पवार म्हणाले.
इंडिया आघाडीमध्ये वाद आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार यांनी, काहीही झाले तर मिळून जाणार आणि मार्ग काढणार, असा निर्धार व्यक्त केला.
उद्धव ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्या घरावर ईडीचा छापा पडल्याच्या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवारांनी, “जोपर्यंत दिल्लीचे सरकार बसत नाहीत तोपर्यंत या गोष्टी चालत राहणार,” असं म्हटलं आहे.
“ईव्हीएमबाबतचा प्रस्ताव आम्ही निवडणूक आयोगाला पाठवला आहे. पण निवडणूक आयोगाने वेळ देणे किंवा चर्चा करणे या दोन्हीही गोष्टी मान्य केलेल्या नाहीत. जयराम रमेश यांनी 12 पाणी पत्र निवडणूक आयोगाला दिले आहे,” असं शरद पवार म्हणाले.