फडणवीसांचा आणखीन एक मंत्री गोत्यात ,मंत्रीविरोधात महिलेचे राजभवनासमोर उपोषण

Another Fadnavis minister in trouble, woman on hunger strike in front of Raj Bhavan against minister

 

 

 

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवले असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी आमदार रोहित पवार यांच्याकडून करण्यात आला.

 

या आरोपानंतर मंत्री जयकुमार गोरे यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. संजय राऊत आणि रोहित पवारांविरोधात जयकुमार गोरे यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव सादर केला आहे.

 

तर आता जयकुमार गोरेंविरोधात तक्रार करणारी महिला समोर आलीय.जयकुमार गोरेंसोबत 2015-2016 मध्ये एका कार्यक्रमात ओळख झाली होती. मात्र, त्यांना माझ्याकडून वेगवेगळ्या अपेक्षा होत्या,

 

असं संबंधित महिलेनं म्हटलंय. तसंच 2017 साली माझ्या आईला आणि मला शिव्या दिल्याचा आरोपही संबंधित महिलेनं केलाय.

तसंच त्यांच्याविरोधातील केस 2019 ला आम्ही संपवली होती, त्यांच्याकडून माफीनामा लिहून घेतला होता. मात्र त्यांना कोर्टाकडून निर्दोष मुक्त केलं नाही,

 

मी केस मागे घेतली नाही. तर पुन्हा धमकीचं पत्र मिळालंय. त्यामुळे 17 मार्चपासून मुंबईतील राजभवनासमोर उपोषणाला बसणार असल्याचं संबंधित महिलेनं केलंय.

 

हे २०१५ ते २०१६ चं प्रकरण आहे. तेव्हापासून आमची ओळखं आहे. एका कार्यक्रमात आमची ओळख झाली. अमुक योजना त्यांच्या तालुक्यात राबवावी यासाठी त्यांना त्यांच्या निवासस्थानी जनता दरबारा दिवशी भेटले होते.

 

त्यानंतर त्यांना माझ्याकडून वेगवेगळ्या अपेक्षा होत्या. २०१७ च्या दरम्यान माझ्या आईला आणि‌ मला त्यांनी शिव्या दिल्या होत्या. तेव्हा त्यांना माफी मागा असं सांगितलं होतं.

 

मात्र यानंतर त्यांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली होती. त्यांच्या विरोधातील केस २०१९ ला आम्ही संपवली होती, तेव्हा माफीनामा मी त्यांच्याकडून लिहून घेतला होता. त्यांना कोर्टाने निर्दोष मुक्त केलं नाही तर मी केस मागे घेतली. हे मी उपकार केलेत, असं महिलेने म्हटलं.

 

जयकुमार गोरेंनी संजय राऊतांसह, रोहित पवार आणि एका पत्रकाराविरोधात हक्कभंग दाखल केला. माझी बदनामी करण्याचा कट आखलाय. माझं यश खटकत असल्याने बदनामीचा कट सुरू असल्याचा आरोप जयकुमार गोरेंनी केला.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *