अमीरखानच्या लेकीचं ‘ग्रँड वेडिंग रिसेप्शन’ पाहा कोणते व्हीआयपी येणार,विविध प्रकारचं जेवण बरचं काही

Ameer Khan's Lekki's 'Grand Wedding Reception', see which VIPs will come, various types of food and much more. ​

 

 

 

 

आमिर खानच्या घरात सध्या सनई चौघडेंचा सूर आहे. वऱ्हाडी मंडळींची लगबग आहे. पाहुण्या मंडळींनी गर्दी केली आहे. अशातच आता आमीरच्या

 

 

लाडक्या लेकीची आयरा खानच्या वेडिंग रिसेप्शनची जोरदार चर्चा रंगली आहे. त्याला बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी हजर राहणार असल्याचे बोलले जात आहे.

 

 

 

आमिर खाननं त्याच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शनचे निमंत्रण बॉलीवूडमधील अनेकांना पाठवल्याचे कळते आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या लेकीचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं.

 

 

त्यानंतर आता चर्चा रंगते आहे ते मुंबईत होणाऱ्या वेडिंग रिसेप्शनची. त्यासाठी मिस्टर परफेक्शनिस्टनं काय काय तयारी केली आहे हेही आपण जाणून घेणार आहोत. शाहरुख, सलमान ते अंबानी परिवारातील सदस्य यावेळी उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे.

 

 

 

कपूर फॅमिली, बच्चन परिवार आणि देओल्स कुटूंबातील सदस्यही या सोहळ्याला हजेरी लावणार असल्याचे बोलले जात आहे.

 

 

 

भलेही आय़रा आणि नुपूर हे लग्न बेडीत अडकले असले तरी त्यांचं सेलिब्रेशन अजून काही संपण्याचे नाव घ्यायला तयार नाहीत.

 

 

त्यामुळेच की काय आता रिसेप्शनच्या बातम्यांनी चाहत्यांची, नेटकऱ्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. राजस्थानमधील उदयपूरमध्ये झालेल्या लग्नानंतर आता ग्रँड रिसेप्शनला कोणकोण येणार याविषयी वेगवेगळे प्रश्न समोर आले आहेत.

 

 

 

इंडिया टुडेनं याबाबत अधिक माहिती देणारे वृत्त दिले आहे. त्यानुसार आमिरच्या लाडक्या लेकीच्या आयराच्या ग्रँड रिसेप्शनला किमान अडीच हजार सेलिब्रेटी उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे.

 

 

यामध्ये आमिर बॉलीवूडमधील अनेकांना निमंत्रण दिले आहे. हे वेडिंग रिसेप्शन मुंबईतील अंबानी यांच्या एनएमएसीसी ग्राउंडवर होणार आहे.

 

 

 

 

या ग्रँड रिसेप्शनसाठी ९ प्रकारचं जेवण असून त्यात गुजराती, लखनवी आणि महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवणही पाहुण्या मंडळीसाठी ठेवण्यात आले आहे. आयरा आणि नुपूरला आशीर्वाद देण्यासाठी देशाच्या विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर येणार असल्याची माहिती आहे.

 

 

 

आयरा आणि नुपूर हे एकमेकांना गेल्या तीन वर्षांपासून डेट करत होते. ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

 

 

 

त्यांच्या साखरपुड्याच्या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला होता. आमिर खानचा आयराच्या लग्नातील डान्स पाहून चाहत्यांना प्रतिक्रिया देण्याचा मोह आवरला नाही.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *