हॉलीवूडचा सुपरहिट चित्रपट ‘मनी प्लेन’ मराठीत येतोय

Hollywood super hit movie 'Money Plane' is coming in Marathi

 

 

 

 

आजवरची सर्वात मोठी चोरी करणारा नायक ज्या चित्रपटात खळबळ उडवून टाकतो, तो हॉलीवूडचा सुपरहिट चित्रपट ‘मनी प्लेन’ आता रसिक प्रेक्षकांना मराठीत पहायला मिळणार आहे.

 

 

 

चित्रपट १५ डिसेंबर २०२३ रोजी ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना मनोरंजनात खोल गुंतवून ठेवणार आहे.

 

 

 

चित्रपटाची कथा ‘मनी प्लेन’ या नावाने ओळखली जाणारी एअरबोर्न कॅसिनोवरील मोठ्या चोरीभोवती फिरते. जिथे जगातील सर्वात मोठमोठे गुन्हेगार उपस्थित आहेत.

 

 

हे मोठमोठे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे गुन्हेगार जुगार खेळण्यासाठी एकत्र येतात, तेव्हा चित्रपटाच्या नायकाला स्वतःवरचे कर्ज मिटवून कुटुंबाला वाचवण्याची संधी मिळते.

 

 

आयुष्यातील सर्वात मोठी चोरी करण्याचे धाडस नायक करणार की कुटुंबाला कर्जात बुडवणार हे चित्रपटात कळणार आहे.

 

 

“चित्रपटाच्या दिग्दर्शकाने पूर्ण अॅक्शन आणि सस्पेन्स भरलेला चित्रपट देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला असेच अॅक्शन आणि रोमांचक चित्रपट पाहायला आवडत असतील तर

 

‘मनी प्लेन’ चित्रपट तुमच्यासाठी अगदी योग्य चित्रपट ठरणार आहे” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *