बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या कुटुंबीयांनी घेतला मोठा निर्णय

Bollywood actor Salman Khan's family has taken a big decision

 

 

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्धीकी यांची गोळ्या झाडून हत्या झाली आहे. आरोपींनी त्यांच्यावर 3 राऊंड फायर केले. त्यांच्या छातीत एक गोळी लागल्यानं त्यांचा मृत्यू झालाय.

 

तिघांनी त्यांच्यावर गोळीबार केला. पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक फरार आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहेत. बाबा सिद्दीकींची हत्या झाल्यानंतर अभिनेता सलमान खाननं लीलावती रूग्णालयात धाव घेतली.

 

तसंच त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाला होता. तेव्हा बाबा सिद्दीकींनी सलमानच्या घरी जाऊन त्याची विचारपूस केली होती. बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यू नंतर सलमान खानच्या कुटुंबीयांनी मोठा निर्णय घेतला आहे.

 

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर त्यांचं बॉलिवूडशी असलेल्या संबंधाची चर्चा सुरू झालीय. त्यांची राजकारणासह बॉलिवूडवरही पकड होती. अनेक कलाकार त्यांचे मित्र होते.

 

बाबा सिद्दीकींनी शाहरूख खान आणि सलमान खान यांच्यातील वाद मिटवला होता. 2008 मध्ये कॅटरिना कैफच्या बर्थ डे पार्टीत दोघांमध्ये वाद झाला होता.

 

त्यानंतर 2013 मध्ये बाबा सिद्दीकींनी शाहरूख आणि सलमान यांना इफ्तार पार्टीचं निमंत्रण दिलं होतं. त्यांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही खानमधील वाद संपला होता.

 

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाला होता. तेव्हा बाबा सिद्दीकी सलमानच्या घरी दाखल झाले होते. त्यानंतर आता बाबा सिद्दीकींची हत्या झाल्यानंतर सलमाननं लिलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं.

 

बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमान खानचे निवासस्थान असलेल्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्यात आली आहे.

 

बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर सलमान खानच्या कुटुंबीयांनी अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. No visitors please म्हणजे कुणीही भेटायला येवू नये अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

 

बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी मोठी माहिती समोर आलीय. 4 जणांनी सुपारी घेऊन बाबा सिद्दीकींची हत्या केल्याची माहिती सूत्रानं दिलीय. प्रत्येक आरोपी 50 हजार रुपये वाटून घेणार होता.

 

चारही आरोपी 2 सप्टेंबरपासून कुर्ल्यात भाड्याच्या रूममध्ये राहत होते. राहत असलेल्या रूमला 14 हजार रुपयांचं भाडं होतं. पंजाबच्या जेलमध्ये असताना हे तिघेही आरोपी एकमेकांच्या संपर्कात आले होते.

 

अधीच जेलमध्ये असलेला एक आरोपी बिष्णोई गँगशी संबंधित होता. बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट गेल्या काही महिन्यांपासून रचल्याचीही माहिती सूत्रानं दिलीय.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *