निवडणूक प्रचारात अचानक अभिनेता गोविंदाची तब्येत बिघडली, रोड शो सोडून मुंबईला रवाना

During the election campaign, actor Govinda's health suddenly deteriorated, left the road show and left for Mumbai

 

 

 

अभिनेता गोविंदा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते आज महायुतीच्या प्रचारासाठी जळगाव जिल्ह्यात आले होते.

 

मात्र पाचोऱ्यामध्ये त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. त्यानंतर रोड शो सुरू असतानाच काही वेळाने त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांच्या छातीमध्ये दुखू लागलं तसेच गोविंदा यांच्या ज्या पायाला गोळी लागली होती

 

तो पाय देखील दुखत असल्यानं त्यांनी आपला दौरा अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते तातडीनं मुंबईकडे रवाना झाले.

दरम्यान यावेळी बोलताना ते म्हणाले की, सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहा आणि महायुतीचे उमेदवार किशोर पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करा. मी किशोर पाटील यांना शुभेच्छा देतो.

 

किशोर पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहेत. देशात होणाऱ्या प्रगतीसोबत आहेत. प्रार्थना करतो की किशोर पाटील हे विजयी होतील.

 

माझी तब्येत ठीक नसल्याने मी इथून निघत आहे, मी इथल्या जनतेची माफी मागतो. इथल्या लोकांनी मला भरभरू प्रेम दिलं आहे. माझी तब्येत ठीक नाही मला गोळी लागलेली होती

 

आणि आता सध्या छातीमध्ये देखील दुखत आहे. रिस्क नको म्हणून मी आता हा दौरा अर्धवट सोडून पुन्हा मुंबईला जात आहे.

किशोर पाटील विजय झाल्यानंतर मी पुन्हा या ठिकाणी येईल, नक्कीच महायुती विजयी होईल. देशाला पुढे नेण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व सितारे पुढे आले आहेत.

 

माझ्यावर महाराष्ट्राच्या भूमीची कृपा राहिलेली आहे. संपूर्ण जगाने नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदेंमुळे महाराष्ट्राकडे बघायला सुरुवात केली, नक्कीच राज्याची प्रगती होत आहे.

 

मी त्या शिवसेनेला देखील माझी सेवा दिलेली आहे. मी शिवसेनेसोबत जोडलेलो आहे. आता मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करत आहे, असं अभिनेता गोविंदा याने म्हटलं.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *