यापूर्वीही खोटे ठरले होते एग्झिट पोलचे अंदाज , विधानसभेला काय होणार?

Exit poll predictions were false before, what will happen to the assembly?

 

 

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान आज एकाच टप्प्यात पार पडलं. मतदान झाल्यानंतर लागलीच नेहमीप्रमाणे एग्झिट पोल अर्थात मतदानोत्तर चाचण्यांचे कल येऊ लागले.

 

यामध्ये पक्षनिहाय आणि आघाडीनिहाय कल समोर आले. लोकसभा निकालांचे पडसाद विधानसभा निवडणुकांवर पडतील, असे अंदाज वर्तवले जात होते. पण एग्झिट पोलमध्ये मात्र चित्र वेगळंच दिसून येत आहे.

 

बहुतेक सर्वच एग्झिट पोलमध्ये महायुतीला राज्यात सरकार स्थापन करण्याइतकं संख्याबळ मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पण एग्झिट पोलचे हे अंदाज खरे ठरतील? कारण लोकसभेवेळी चित्र बरोबर उलटं झालं होतं!

 

काय आहेत एग्झिट पोलचे अंदाज?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीचे एग्झिट पोलचे अंदाज समोर आले असून त्यात महायुतीला बहुमत मिळेल असं नमूद करण्यात आलं आहे.

 

एकूण १० पैकी सहा एग्झिट पोल्सनं महायुतीलाच बहुमत मिळेल असा कौल दिला आहे. यामध्ये पी-मार्क, पीपल्स पल्स, मॅट्रिझ, चाणक्य, लोकशाही मराठी रुद्र अशा काही एग्झिट पोल्सचा समावेश आहे.

 

आघाडीनिहाय एग्झिट पोलचे अंदाज

पोल महायुती मविआ इतर
P-MARQ १३७ – १५१ १२६ ते १४६ २ ते ८
People’s Pulse १७५ ते १९५ ८५ ते ११२ ७ ते १२
Matrize १५० ते १७० ११० ते १३० ८ ते १०
Lokshahi-Marathi Rudra १२८ ते १४२ १२५ ते १४० १८ ते २३
JVC १०५ ते १२६ ६८ ते ९१ ८ ते १२
Chanakya १५२ ते १६० १३० ते १३८ ६ ते ८
Dainik Bhaskar १२५ ते १४० १३५ ते १५० २० ते २५
Electoral Edge ११८ १५० २०
Poll Diary १२२ ते १८६ ६९ ते १२१ १० ते २७

 

 

या एग्झिट पोल्समुळे सत्ताधाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी महाराष्ट्रात एग्झिट पोलचे अंदाज बरोबर उलटे झाल्याचं नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत

 

राज्यानं पाहिलं आहे. त्यामुळे हे एग्झिट पोलदेखील फिरणार की सत्ताधाऱ्यांना कौल मिळणार? याची आता उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

लोकसभेवेळी काय होते एग्झिट पोलचे अंदाज?

पोल महायुती मविआ इतर
इंडिया न्यूज डी डायनॅमिक्स ३४ १३
न्यूज २४ चाणक्य ३३ १५
रिपब्लिक भारत-मॅट्रीझ ३० ते ३५ १३ ते १९
रिपब्लिक PMARQ २९ १९
टीव्ही ९ पोलस्ट्राट २२ २६
एबीपी-सी व्होटर २४ २३

 

दरम्यान, या एग्झिट पोलच्या बरोबर उलटे निकाल प्रत्यक्षात महाराष्ट्रात लागल्याचं पाहायला मिळालं. महायुतीची थेट १७ जागांवर पीछेहाट झाली, तर महाविकास आघाडीनं ३१ जागांवर यश मिळवलं.

 

त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीला बहुमताचा अंदाज वर्तवणारे एग्झिट पोल खरे ठरतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *