काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर;पाहा कोणाला मिळाली संधी?

Congress announced the second list of 23 candidates; see who got a chance?

 

 

 

विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. आज (२६ ऑक्टोबर) काँग्रेसची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.

 

या दुसऱ्या यादीमध्ये २३ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. याआधी काँग्रेसने पहिल्या यादीत ४८ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आज दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.

 

महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह राज्यातील काही काँग्रेस नेत्यांची दिल्लीत शुक्रवारी महत्वाची बैठक पार पडली.

 

या बैठकीत महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत सविस्तर चर्चा झाली. यानंतर आज (२६ ऑक्टोबर) काँग्रेसकडून २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.

 

 

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत जागावाटपावरून मतभेद सुरु होते. यासंदर्भात महाविकास आघाडीतील नेत्यांच्या अनेक बैठकाही पार पडल्या.

 

त्यानंतर ८५-८५-८५ जागांचा फॉर्म्युला समोर आला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा या फॉर्म्युल्यात बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली. यानंतर आता ९०-९०-९० चा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.

 

 

 

Image

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *