उमेदवारी नाकारल्यावरून भाजप खासदारांचा मोदींवर रोष व्यक्त
BJP MPs express anger at Modi for rejecting candidature

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत अनेक विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्यात आली आहेत.
भोपाळच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांचाही या यादीत समावेश आहे. यावेळी त्यांच्या जागी आलोक शर्माला संधी देण्यात आली आहे.
‘आज तक’च्या वृत्तानुसार, भाजपने त्यांना तिकीट नाकारलं. याबाबत त्यांना विचारलं असता प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या की, मी कदाचित काही शब्द बोलले असतील जे मोदींना आवडले नसतील.
त्या म्हणाल्या, कोणाला तिकीट द्यायचे आणि कोणाला नाही, हा संघटनेचा निर्णय आहे. यामध्ये तिकीट का कपालं गेलं. ते कोणाला का दिलं गेलं, याचा अजिबात विचार करू नये. त्या म्हणाल्या, मी यापूर्वी तिकीट मागितले नव्हते आणि आताही नाही
दरम्यान, भाजपने कालच १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये ३४ विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्यात आली आहेत.
प्रज्ञा ठाकूर यांचे तिकीट कापले जाईल, याची चर्चा आधीच राजकीय वर्तुळात सुरु होती. प्रज्ञा ठाकूर यांच्या वादग्रस्त विधानांवर पक्ष नेतृत्व नाराज असल्याचे मानले जात होते. अशातच त्यांच्या तिकिटावर कात्री लागण्याची सर्वाधिक शक्यता होती.
अनेकदा वादग्रस्त विधाने करून टीकेच्या भोवऱ्यात सापडलेल्या प्रज्ञा ठाकूर यांनी असे वक्तव्य केले होते, ज्यावर पंतप्रधान मोदींनीही नाराजी व्यक्त केली होती
आणि त्यांना (प्रज्ञा ठाकूर यांना) कधीही माफ करू शकणार नाही, असे म्हटले होते. प्रज्ञा ठाकूर यांनी महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला खरा देशभक्त म्हटले होते.
त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांसह पक्षांतर्गतही जोरदार टीका झाली होती. प्रज्ञा ठाकूर यांनी माफी मागितली असली तरी आपण त्यांना कधीही माफ करू शकणार नाही, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले होते.