जया बच्चन म्हणाल्या, भाजपाच्या खासदाराला अभिनयासाठी पुरस्कार द्यायला हवा

Jaya Bachchan said BJP MP should be given an award for acting

 

 

 

बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन नेहमीच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. अभिनयासोबतच जया बच्चन या राजकारणात चांगल्याच सक्रिय आहेत. आता जया बच्चन यांनी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसतंय.

 

त्यांनी मोठा आरोप केलाय. जया बच्चन यांनी थेट म्हटले की, शहरातील रुग्णालयात उपचार घेत असलेले भाजपचे खासदार ‘नाटक’ करत आहेत.

 

हेच नाहीतर समाजवादी पक्षाच्या (एसपी) खासदार जया बच्चन यांनी पुढे थेट म्हटले अभिनयाचा पुरस्कार देखील त्यांना दिला जाऊ शकतो.

 

जया बच्चन यांनी पत्रकारांना बोलत म्हटले की, अभिनेत्री म्हणून मी माझ्या कारकिर्दीत भाजप खासदार प्रताप चंद्र सारंगी, मुकेश राजपूत आणि एस. फांगनोन कोन्याक यांच्यापेक्षा चांगले कलाकार कधीच बघितले नाहीत.

 

सपा आणि विरोधी‘इंडिया’गठबंधन यांची हीच खरी संस्कृती असल्याचे म्हणत भापजाने प्रत्युत्तर दिले आहे. लोकसभेत राहुल गांधी यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

गुरुवारी दिल्ली पोलिसांनी संसद परिसरात झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली. संसद भवनाच्या परिसरात गुरूवारी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे सदस्य एकमेकांसमोर आले

 

आणि घोषणाबाजी केली. विरोधी पक्ष आणि एनडीएच्या खासदारांमध्ये झालेल्या हाणामारीत माजी मंत्री प्रतापचंद्र सारंगी आणि लोकसभा सदस्य मुकेश राजपूत जखमी झाले.

भाजप खासदार अनुराग ठाकूर आणि बन्सुरी स्वराज यांनी राहुल यांच्याविरोधात बीएनएसच्या 7 कलमांखाली खुनाचा प्रयत्न, धमकावणे आणि धक्काबुक्की केल्याच्या आरोपांसह पोलिसांकडे तक्रार केली होती.

 

पोलिसांनी कलम 109 (हत्येचा प्रयत्न) काढून फक्त 6 कलमांखाली एफआयआर नोंदवला आहे. याप्रकारानंतर प्रताप चंद्र सारंगी यांना थेट रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना संसद परिसरातच उपचार देण्यात आले होते. त्यावर बोलताना आता जया बच्चन या दिसल्या आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *