अजितदादांसमोरच,धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढण्याची गावकऱ्यांची प्रचंड घोषणाबाजी

Villagers raise slogans demanding removal of Dhananjay Munde from the cabinet in front of Ajitdada

 

 

 

बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली.

 

या घटनेचे पडसाद विधानसभेत देखील उमटले. आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, पीडित कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी आमदारांकडून करण्यात आली.

 

दरम्यान आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली. दरम्यान शरद पवार यांच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आजच देशमुख कुटुंबाची भेट घेतली आहे.

 

अजित पवार जेव्हा संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी मस्साजोगमध्ये पोहोचले तेव्हा ग्रामस्थ चांगलेच आक्रम झाले. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाका

 

अशी जोरदार घोषणाबाजी गावकऱ्यांच्या वतीनं करण्यात आली. धनंजय मुंडे यांनी पक्षपातीपणा केला आहे, त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाका अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून करण्यात आली.

 

यावेळी बोलताना एका ग्रामस्थानं म्हटलं की, ‘माझं म्हणण असं आहे की आपले मुख्यमंत्री त्यांच्याकडे गृहखातं आहे. चांगलं म्हणून त्यांचं नाव आहे, देशभरात महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाचा दबदबा आहे.

 

मात्र तेरा दिवस झाले तरी यांना तीन आरोपी सापडत नाहीत, याचा अर्थ काय? असा सवाल या ग्रामस्थाने उपस्थित केला आहे.

 

अजित पवार यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की मी तुम्हाला शब्द देतो या प्रकरणातील मास्टर मांइड सुटणार नाही.

 

दरम्यान अजित पवार यांच्या आधीच आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली.

 

यावेळी बोलताना शरद पवार यांनी म्हटलं की या घटनेच्या खोलात गेलं पाहिजे, या घटनेचा सूत्रधार कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार या प्रकरणाच्या खोलात जाईपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

 

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाली. या घटनेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. तसेच याचे पडसाद विधानसभा

 

आणि लोकसभेमध्येही उमटले. महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभेत आणि खासदारांनी लोकसभेत हा विषय मांडून न्याय देण्याची मागणी केली.

 

यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मस्साजोग गावात जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

 

तदरम्यान, त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेत या घटनेतील मास्टरमाईंड कोणीही असो, त्याला सोडणार नाही. आरोपींवर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन अजित पवार यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना दिलं आहे.

 

“ही घटना खूप वेदनादायी आहे. आम्ही या प्रकरणाची दोन प्रकारे चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. तुमच्यावर मोठा अघात झाला आहे.

 

आता गेलेली व्यक्ती परत येऊ शकत नाही. मात्र, या प्रकरणात ज्यांचे कोणाचे लागेबांधे असतील आणि जो कोणी मास्टरमाईंड असेल त्या कोणालाही आम्ही सोडणार नाही. पोलिसांनी देखील यावर अॅक्शन घेतली आहे”, असं अजित पवार यांनी म्हटलं.

 

संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर गावकऱ्यांशी बोलताना अजित पवार म्हणाले, “तुमच्या गावामध्ये जी घटना घडली त्या घटनेचं दु:ख आहे.

 

मी तुम्हाला हा विश्वास देण्यासाठी आलो आहे की, कोणत्याही परिस्थितीत कोणताही राजकीय हस्तक्षेप या प्रकरणात होणार नाही. माझा तुम्हाला शब्द आहे की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही.

 

यामध्ये जो कोणी मास्टरमाईंड आहे, त्यालाही सोडलं जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सभागृहात आरोपींवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. या घटनेची आम्ही दोन प्रकारे चौकशी करणार आहोत.

 

एक म्हणजे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या माध्यमातून आणि न्यायालयीन चौकशी देखील करणार आहोत. यामध्ये काही त्रुटी राहणार नाहीत याची काळजीही घेतली जाईल”, असं आश्वासन अजित पवारांनी मस्साजोगच्या ग्रामस्थांना दिलं.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *