बीड जिल्ह्यात विधानसभेचे आघाडी आणि महायुती तिकीट कुणाला ?
Who is the leader of the assembly and the grand alliance ticket in Beed district?

राज्यातील विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून राज्यात निवडणुकीचा रणसंग्राम पाहायला मिळत आहे. निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.
अशातच यंदा राज्यात मुख्य लढत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी दिसून येणार आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही आघाड्यांच्या
वतीनं आपापल्या परीनं मोर्चेबांधणी सुरू आहे. अशातच आता महाविकास आघाडीकडून बीड जिल्ह्याचा फॉर्म्युला समोर आला आहे.
बीड जिल्ह्यातील सहा जागांपैकी पाच जागांवर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
तर एका म्हणजे, गेवराई विधानसभा मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटानं दावा केला आहे. महाविकास आघाडीकडून परळी विधानसभा मतदारसंघ, केज विधानसभा मतदारसंघ,
माजलगाव विधानसभा मतदारसंघ, बीड विधानसभा मतदारसंघ आणि आष्टी विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत.
बीडमधील महा विकास आघाडीचे उमेदवार कोण?
बीड विधानसभा मतदारसंघ : संदीप क्षीरसागर
केज विधानसभा मतदारसंघ : अंजली घाडगे
परळी विधानसभा मतदारसंघ : राजेभाऊ फड
आष्टी विधानसभा मतदारसंघ : मेहबूब शेख
माजलगाव विधानसभा मतदारसंघ : रमेश आडसकर
बीड जिल्ह्यात महायुतीकडून दोन जागेवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असतील आणि चार जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार असतील.
बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघ आणि केज विधानसभा मतदारसंघ मधून भाजपचे उमेदवार महायुतीकडून निवडणूक लढवतील.
तर, अजित पवार गटाकडून बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे चार उमेदवार असतील माजलगाव विधानसभा मतदारसंघ गेवराई विधानसभा मतदारसंघ
परळी विधानसभा मतदारसंघ आणि बीड विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी अजित पवार गटाचे उमेदवार पाहायला मिळतील.
परळी विधानसभा मतदारसंघ : राष्ट्रवादी काँग्रेस : धनंजय मुंडे
माजलगाव विधानसभा मतदारसंघ : राष्ट्रवादी काँग्रेस : प्रकाश सोळंके
बीड विधानसभा मतदारसंघ : राष्ट्रवादी काँग्रेस : योगेश शिरसागर
गेवराई विधानसभा मतदारसंघ : राष्ट्रवादी काँग्रेस : विजयसिंह पंडित