अ‍ॅपच्या प्रचाराची जाहिरात करणारी अभिनेत्री मल्लिका शेरावत ED च्या रडारवर

Actress Mallika Sherawat on ED's radar for promoting app

 

 

 

अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) पाकिस्तान नागरिक असलेल्या सट्टेबाजी अ‍ॅपचा पडदाफास करण्यात आला आहे. मॅजिकविन अ‍ॅपचे पाकिस्तानी कनेक्शन त्यामुळे उघड झाले आहे.

 

या अ‍ॅपचा पैसा भारतातून दुबईमार्ग पाकिस्तानात जात होता. या अ‍ॅपचे प्रमोशन सेलिब्रेटीजकडून करण्यात आले. लहान आणि

 

मोठ्या पडद्यावरील कलाकारांनी सोशल मीडियावर या मॅजिकविन अ‍ॅपचा प्रचार केला. या प्रकरणात ईडीने मल्लिका शेरावत आणि पूजा बनर्जी यांची चौकशी केली. तसेच या आठवड्यात आणखी दोन जणांची चौकशी होणार आहे.

 

मॅजिकविन अ‍ॅप हे एक सट्टेबाजीची अ‍ॅप आहेत्याला गेमिंग वेबसाइट म्हणून पाहिले जाते. या अ‍ॅपचा मालक पाकिस्तानी आहे. या अ‍ॅपला दुबईत राहणारे भारतीय नागरिक चालवत आहे.

 

वेबसाइटवर असणारे सट्टेबाजीची खेळ फिलिपीन्स आणि इतर देशांत खेळले जात होते. त्या ठिकाणी सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता आहे.

 

या सट्टेबाजी मॅजिकविन अ‍ॅपचे सोशल मीडिया अकाउंट आहे. त्याचा उपयोग भारतात प्रमोशनसाठी करण्यात आला. अहमदाबाद पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

ईडीने मागील सहा महिन्यात 67 ठिकाणी या प्रकरणात छापे टाकले आहे. त्यात पुणे, मुंबई, दिल्लीत कारवाई करुन 3.55 कोटी रुपये जप्त केले आहे. या प्रकरणात मल्लिका शेरावत आणि पूजा बनर्जी यांची चौकशी झाली आहे.

 

तसेच आणखी दोघं सेलिब्रेटीजची चौकशी होणार आहे. तसेच पुढील आठवड्यात कमीत कमी सात सेलिब्रेटीजला बोलवण्यात येणार आहे.

अ‍ॅपमध्ये विजेते झालेल्यांचा पैसे पेमेंट गेटवे आणि बनावट कंपन्यांच्या एग्रीगेटरद्वारे बँक खात्यात हस्तांतरित केले गेले. याशिवाय देशांतर्गत

 

मनी ट्रान्सफर (डीएमटी) द्वारेही पैसे पाठवले जात होते. हा पैसा पाकिस्तानला पाठवण्यात आल्याचे उघड झाल्यामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट आहे.

 

अनेक सेलिब्रिटींनी या अ‍ॅपची जाहिरात करत असल्यामुळे सर्वसामान्यांची दिशाभूल होऊ शकते. त्यामुळे अशा अ‍ॅप्सबाबत लोकांनी सावध राहण्याची गरज आहे.

 

या प्रकरणामुळे ऑनलाइन गेमिंग आणि सट्टेबाजीच्या नियमांवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. कायदेशीर त्रुटींचा फायदा घेऊन असे रॅकेट चालवले जात असल्याचे पुन्हा दिसून आले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *