‘जन्मऋण’चे गुपित २२ मार्च २०२४ रोजी पाहा
Watch The Secret of 'Janmarun' on March 22, 2024
लोकप्रियतेचा उचांक गाठणाऱ्या दामिनी या मालिकेच्या लेखिका, निर्माती आणि दिग्दर्शक अर्थात अभिनेत्री कांचन घारपुरे उर्फ कांचन अधिकारी ह्या एक नवा विलक्षण विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
आपल्या सुसंस्कृत मराठमोळ्या कुटुंबात घडलेल्या सत्यघटनेवर त्यांनी ‘जन्मऋण’ या नव्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मनोरंजनातून प्रभोधन करीत थेट प्रेक्षकांच्या काळजात स्थान मिळविण्यासाठी ‘आभाळमाया’
या पहिल्या लोकप्रिय दैनंदिन मालिकेतील जोडी शरद आणि सुधा जोशी अर्थात अभिनेते मनोज जोशी आणि अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांची साथ त्यांना लाभली आहे.
आज निव्वळ भारतात ३२,००० च्या वर केसेस आहेत ज्यात स्वतःच्या मुलानेच आपल्या आई-वडिलांना त्यांच्या म्हातारपणी आपल्यापासून दूर केलेले आहे.
‘जन्मॠण’ हा नवीन चित्रपट याच विषयावर आधारित आहे. न्यायालयातर्फे अशा मुलांना शिक्षाही आहेत. जन्मदात्या आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांना ‘कलम-5’ तर्फे तुरुंगवासही भोगाव लागतो.
समाजात आपल्या आई-वडिलांना प्रेमाने व आदराने आपल्या मुलांनी वागवावे केवळ याच एका सद्भावनेने या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन कांचन अधिकारी यांनी केलेले आहे.
आतापर्यंत आपण त्यांना चित्रपटाच्या व दूरदर्शनच्या माध्यमातून ओळखतो एक सकस कलाकृती घेऊन त्या तुमच्या भेटीला २२ मार्चपासून येत आहेत.
‘गणेश फिल्म्स’ निर्मित आणि ‘श्री. अधिकारी ब्रदर्स’ प्रस्तुत ‘जन्मऋण’ चित्रपटाच्या लेखिका, निर्माती, दिग्दर्शक आहेत कांचन अधिकारी. या चित्रपटात मनोज जोशी, सुकन्या कुलकर्णी, सुशांत शेलार, तुषार आर.के., अनघा अतुल,
शशी पेंडसे, प्रज्ञा करंदीकर, धनंजय मांद्रेकर, दर्पण जाधव, विराज जोशी, कपील पेंडसे, सिद्धेश शिगवण आणि पाहुणे कलाकार म्हणून खास भूमिकेत हिंदी मालिका-चित्रपट अभिनेते महेश ठाकूर,
निहारिका रायजादा यांनी काम केले आहे. डीओपी सुरेश देशमाने यांच्या कॅमेऱ्यातून जन्मऋणचे सौन्दर्य अधिकच खुलले असून संगीतकार वैशाली सामंत
आणि गायक सुदेश भोसले, वैशाली सामंत यांच्या संगीत सुरावटीने ही कथा अधिक रंग भरते.येत्या २२ मार्चला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्की पहा व नवीन दृष्टिकोन मिळवा.